Share

श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या सामन्यात बाद झाल्यावर केलेल्या ‘या’ चुकीमुळे तमिम इक्बालने ठोठावला दंड

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बांग्लादेशच्या दौऱ्यावर असलेल्या श्रीलंका संघाला नुकत्याच पार पडलेल्या एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत २-१ अशा पराभवाचे तोंड बघावे लागले. मालिकेतील पहिले दोन्ही सामन्यात दारुण पराभव स्विकारल्यानंतर तिसऱ्या आणि आखेरच्या सामन्यात श्रीलंकेने जोरदार पुनरागमन करत ९७ धावांनी विजय मिळवला.

या सामन्यात बांग्लादेशचा महत्वाचा खेळाडू तमिम इक्बालला त्याने केलेल्या एका चुकीमुळे आयसीसीने दंड ठोठावला. श्रीलंकेने दिलेल्या २८७ धावांचा पाठलाग करताना १० व्या षटकात तिसऱ्या चेंडुवर तमिम इक्बाल झेलबाद झाला. पंचाने तमिमला बाद दिल्यानंतर त्याने डीआरएस रिव्हू घेतला. मात्र टिव्ही रिप्लेमध्ये चेंडू त्याच्या बॅटला लागला असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. त्यामुळे तिसऱ्या पंचांनीही तमिमला बाद करार केले.

डीआरएसमध्ये बाद असल्याचे बघताच तमिमने अपशब्दांचा वापर केला. त्यामुळे आयसीसीने त्याला दंड ठोठावत १५ टक्के रक्कम वसुल केली. आयसीसीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात लिहिले आहे की, तमिम इकबाल खेळाडू आणि आयसीसीमधील सहयोगी सदस्यांच्या आचारसंहितेचा कलम २.३ मध्ये दोषी आढळला आहे. यात आंतरराष्ट्रीय सामन्यात अपशब्द वापरल्याचा देखील उल्लेख आहे. यासोबतच त्याच्या शिस्तीच्या रेकॉर्डमध्ये एक डिमेरीट पॉइंट देखील जोडला गेला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!