Share

‘सरकारला फक्त अल्टिमेटम न देता सर्व मराठा संघटनांना सोबत घेऊन भूमिका मांडा’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली ‘रोखठोख’ भूमिका जाहीर केली आहे. समाजाच्या संतप्त भावना समजून घेतल्यानंतर तसंभाजीराजे यांनी आता रणशिंग फुंकले आहे. ‘कोरोनाच्या काळात जीव महत्वाचा आहे. मात्र, मराठा समाजाला गृहीत धरलं जात असून आता हद्द पार झाली असल्याचं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडी सरकारला ६ जून पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यांनी समाजाच्या प्रमुख ५ मागण्या केल्या असून त्या मान्य न झाल्यास ६ जून पासून मोठं आंदोलन छेडलं जाईल असं संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं आहे.

त्यावर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी संभाजीराजे यांना एक सल्ला दिलाय. ‘मराठा आरक्षणाच्या संदर्भात संभाजीराजे यांनी मांडलेली भूमिका मराठा समाजाच्या हिताची आहे. मात्र, राज्य सरकारला फक्त अल्टिमेटम न देता सर्व मराठा संघटनांना सोबत घेऊन भूमिका मांडण्याची गरज आहे.’ असे विखे पाटील म्हणाले आहेत.

‘महाविकास आघाडी अपयशी ठरल्यानं केंद्राकडे बोट दाखवलं जात आहे. स्वत:चं अपयश झाकण्यासाठी आघाडीचा वेळ खर्ची जात आहे. सरकारमधील मंत्री जी विधानं करत आहेत. त्यावरुन सरकारचा हेतू प्रामाणिक दिसत नाही. सकल मराठा समाजाने एका व्यासपीठावर एकत्र यावं. एकत्रितपणे सरकारवर दबाव आणून आरक्षण आपल्या पदरात पाडून घ्यावं,’ असं मत राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केल आहे.

तसेच ‘संभाजीराजे यांनी नवा पक्ष काढावा किंवा नाही हा त्यांच्या वैयक्तिक प्रश्न आहे. मराठा समाजाने कोणत्याही पक्षाच्या बाजूने आपली भूमिका उभी केली नाही. सर्वांनी एकत्र येऊन भूमिका घ्यावी,’ असंही विखे-पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

काय आहेत संभाजीराजेंच्या ‘त्या’ ५ मागण्या ?

  •  ९ सप्टेंबर 2020 च्या आधीच्या उमेदवारांना नियुक्ती देऊन टाका.
  • शाहू महाराजांच्या नावाने उभं केलेल्या सारथीसाठी कमीत कमी १ हजार कोटी द्यावे. मुख्यमंत्री म्हणाले जागा दिलीये, पण नुसतं जागा देऊन काय होणारे ? तिथं चांगली लोकं द्या…नाही तर रद्द करून टाका, असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला आहे.
  • अण्णासाहेब पाटील महामंडळाची पुन्हा उभारणी करा.
  • प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह तयार करा, हे राज्य सरकारच्या हातात आहे. ते तरी करा
  • ७० टक्के गरीब मराठा समाजाची चुक काय ? मराठा समाज देखील बहुजनांचा घटक त्यांनाही सवलती द्या !

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!