🕒 1 min read
मुंबई : कंगनाचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं असलं तरी कंगनाने ट्विटरवर आरोप करणं थांबवलेलं नाही. वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत कंगनाने गेल्या काही दिवसात ट्विटर आणि ट्विटरच्या कार्यपद्धतीवर वेळोवेळी निशाणा साधला आहे. ट्विटरने जारी केलेल्या पत्रकावरून कंगनाने ट्विटरवर टीका केली आहे.
या पत्रकात ट्विटरने कायद्याचं पालन करत आम्ही भारतीय लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं आणि गोपनियतेचं रक्षण करणार असल्याचं म्हंटलं आहे. याच मुद्द्यावरुन कंगनाने ट्विटरला घेरलं आहे. कंगनाचं ट्विटर अकाऊंट बंद झाल्यानंतर आता ती इन्स्टाग्रामवर सक्रिय झाली आहे. इन्स्टास्टोरीवर पोस्ट शेअर करत कंगना तिचं मत मांडताना दिसत असते. गुरुवारी कंगनाने इन्स्टास्टोरीला एक पोस्ट शेअऱ करत ट्विटरवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

कंगना तिच्या पोस्टमध्ये म्हणाली, “बिचारा ट्विटर, अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी भीक मागत आहे. संसदेचा अनिर्वाचित सदस्य, जगातील सर्वोच्च न्यायाधीश, मानवतेच्या नैतिकतेचा रक्षक आणि या शक्तीची मागणी करण्यासाठी किंवा सक्ती करण्याची त्याची मूलभूत पात्रता काय आहे? हे आहेत तरी कोण? मुठभर ड्रग्ज घेणाऱी लोकं, जी सहज विकली जाऊ शकतात.” असं म्हणत कंगनाने ट्विटरवर निशाणा साधला आहे.
पुढे कंगना तिच्या पोस्टमध्ये म्हणाली की, ” फॉलोअर्स पासून प्रमोशनल ट्विट, प्रत्येक गोष्टीची किंमत असते. हे ते भांडवलदार आणि प्रायव्हेट बिझनेसमन आहेत ज्यांना देश चालवायचाय आहे. सरकारला धमकावून त्यावर नियंत्रण आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आपण ईस्ट इंडिया कंपनीकडून काहीच शिकलो नाही का?” असा प्रश्न कंगनाने विचारला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- उस्मानाबादला मोठा दिलासा; तब्बल दीड महिन्यानंतर रुग्णांच्या संख्येत घट
- लॉकडाऊनमुळे रोजगार गेला, हप्ते भरायला पैसे नाही; शेवटी गळफास लाऊन केली आत्महत्या!
- इंग्लंड दौऱ्याआधी जडेजाने शेअर केला धोनीसोबतचा जुना फोटो; आठवणीला दिला उजाळा
- बीडमध्ये ७०३ नवे रुग्ण तर ८८७ रुग्ण कोरोनामुक्त!
- …तर काँग्रेसला योग्य तो विचार करावाच लागेल, नितीन राऊत आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
