🕒 1 min read
पुणे: कोरोनाचा वाढता प्रसार पुण्यात अधिक असल्याचे पाहता कडक निर्बंध लागू करण्यात आले. पुणेकरांनी कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी पुणे पोलीस रात्र दिवस आपले कर्तव्य बजावत आहे. या संकटाच्या काळात पुणे पोलिसांच्या मदतीला एक खास रक्षक आला आहे. तो म्हणजे SPO ‘राजा’ नावाचा ३ पायाचा कुत्रा पोलिसांना मदत करत आहे.
जगंली महाराज रस्त्यावर बालगंधर्व चेकपोस्टवर हा श्वान पोलिसांना मदत करत आहे. याबाबत पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी SPO राजाचे फोटो ट्वीट करत त्याचे कौतुक केले आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ट्वीट म्हंटले की, ‘आमचा हा खास पोलीसमित्र आहे, ३ पायाचा हा श्वान बालगंधर्व येथील चेकपोस्टवर एक जागरुक सहकाऱ्याप्रमाणे काम करत आहे. संपूर्ण लॉकडाऊनच्या काळात तो पोलीस अधिकाऱ्यांसोबत होता’, असं म्हणत अमिताभ गुप्ता यांनी कौतुक केले.
Serving the city with all his might – Raja the three legged canine in Pune! https://t.co/5TuANNhk8t@CPPuneCity #Pune #lockdown #CoronavirusIndia #animals #DogsofTwittter https://t.co/8YQuDN7oIN
— John Abraham (@TheJohnAbraham) May 24, 2021
दरम्यान, बॉलिवूडचा अभिनेता जॉन अब्राहम याने सुद्धा राजाच्या कामाचे कौतुक करत ट्वीट केले आहे. यात जॉन म्हणाला की,’पुण्यातील हा तीन पायाचा श्वान सर्व ताकदपणाला लावून शहराची सेवा करत आहे’. ‘राजा’ नावाचा हा श्वान लॉकडाऊन लागल्यापासून पोलिसांसोबत आहे. फार पूर्वी त्याने आपला पाय गमावला होता. पण, पोलीस त्याची काळजी घेतात आणि त्याला जेवण सुद्धा देतात. पुणेकरांनीही राजाचे कौतुक केले असून त्याची देखभाल केल्याबद्दल पुणे पोलिसांचे देखील आभार मानले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मायावतींवर केलेल्या अश्लिल विनोदामुळे अभिनेता रणदीप हुड्डा अडचणीत
- गिरीश कुबेर यांच्या अडचणीत वाढ ; पुण्यामध्ये भाजपकडून पोलिसात तक्रार दाखल
- ‘व्हॉट्सअॅप वापरणा-यांची प्रायव्हसी धोक्यात आणू देणार नाही; मोदी सरकारच्या अटी अमान्य’
- शरद पवार-मुख्यमंत्री ठाकरे भेट : पवारांना माझा सॅल्यूटच; एकनाथ शिंदेंनी केलं कौतुक !
- अर्धे कोविड केअर सेंटर बंद झाल्यानंतर विभागीय पथकाचा हा ‘विशेष’ अहवाल आला समोर!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
