🕒 1 min read
मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भारतातील आयपीएल स्पर्धा बीसीसीआयने अर्ध्यातच स्थगित केली. या स्पर्धेनंतर काही दिवसातच बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. मात्र संघात भारतीय सलामीवीर पृथ्वी शॉला पुन्हा डावलले गेले.
दरम्यान, काही वर्षांपूर्वी पृथ्वी शॉ मोठ्या अडचणीत सापडला होता. पृथ्वीने एका स्पर्धेदरम्यान जून 2019 मध्ये कफ सिरपचं सेवन केलं होतं. त्यामुळे त्याची डोपिंग टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. यामुळे बीसीसीआयने पृथ्वीवर 8 महिन्यांची निलंबनात्मक कारवाई करण्यात आली होती. दोन वर्षानंतर पृथ्वीने या प्रकरणाबाबत भाष्य केलं आहे
क्रिकबझसोबत बोलताना पृथ्वी शॉ म्हणाला, ‘या सर्व प्रकरणासाठी मी आणि माझे वडील जबाबदार होते. तेव्हा मी सय्यद मुश्ताक अली स्पर्धेसाठी इंदूरमध्ये होतो. त्यावेळेस माझी प्रकृती बिघडली. मला खोकला आणि सर्दी होती. याबाबत मी वडिलांसोबत मोबाईलद्वारे संवाद साधला. तेव्हा वडिलांनी कफ सिरप घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, मी संघातील वैद्यकीय पथकाला माहिती न देता परस्पर कफ सिरपचं सेवन केलं’, असं पृथ्वीने स्प्षट केलं.
‘तो काळ माझ्यासाठी अत्यंत वाईट काळ होता. तेव्हा माध्यांमध्ये माझ्याबद्दल सर्वत्र चर्चा सुरु होत्या. हे सर्व माझ्या सहन शक्तीच्या पलीकडे झाले होते. त्यामुळे मी विदेशी निघून गेलो. तिथे मी स्वतःला बंद खोलीत कोंडून घेतलं होत’, असंही पृथ्वीने स्पष्ट केलं आहे.
काय आहे डोपिंग टेस्ट ?
खेळाच्या नियमांनुसार, कोणत्याही खेळाडूला स्पर्धेदरम्यान किंवा इतर वेळेस अशा कोणत्याही पदार्थाचं सेवन करता येत नाही ज्याने शक्ती वाढवण्यास मदत होईल, खेळाडू ताकद वाढवण्यासाठी किंवा दमदार कामगिरी करण्यासाठी उत्तेजक पदार्थांचे सेवन करतात. खेळाडूने उत्तेजक पदार्थ घेतलेत का, हे जाणून घेण्यासाठी स्पर्धेदरम्यान डोपिंग चाचणी केली जाते. ही डोपिंग टेस्ट कधीही केली जाते.
महत्वाच्या बातम्या
- आयपीएल स्थगितीमुळे भारतीय संघाला होणार ‘असा’ फायदा- रॉस टेलर
- पदोन्नती आरक्षण : सरकारमधील वाद टोकाला, कॉंग्रेस मंत्र्याने दिला थेट ‘हा’ इशारा
- आकडेवारी जाहीर ; देशात आतापर्यंत तब्बल ‘इतक्या’ लोकांचे झाले लसीकरण
- ‘मोदींच भावनिक होणे आणि डोळ्यातले अश्रू म्हणजे ठरवून केलेला कार्यक्रम’
- राजगडाच्या मातीतून ऐतिहासिक वस्तूंचा उलगडा; सह्याद्री प्रतिष्ठानला सापडल्या अनमोल गोष्टी !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
