Share

विराटने केली होती माजी महिला क्रिकेटपटुला आर्थिक मदत; नुकतेच झाले क्रिकेटपटुच्या आईचे निधन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासुन कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरनाच्या या संसर्गात अनेक मान्यवरांना आपल्य प्रियजणांना गमवावे लागले. या काळात देशभरात आरोग्य आणिबाणीची स्थिती निर्माण झाली होती. यादरम्यान भारतीयांनी एकत्र येत याला लढा दिला. यात भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडूही मागे नव्हते.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने कोरोनाच्या या काळात अनेक गरजुंना आर्थिक मदत केली. यात एका भारताच्या माजी महिला क्रिकेटपटु के एस श्रावंती नायडूलाही मदत केली होती. श्रावंतीची आई एस के सुमन यांचे २२ मे रोजी निधन झाले. ज्यावेळी त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यावेळी विराटने श्रावंतीला ६.७७ लाख रुपयांची मदत केली होती. बीसीसीआयच्या माजी महिला क्रिकेट संयोजक विद्या यादव यांनी ट्विट करत विराट कोहलीकडे मदत मागितली होती.

यानंतर विराटने ट्विटला प्रतिक्रिया देताना श्रावंतीच्या आईला ६.७७ लाख रुपयांची मदत केली होती. यानंतर विद्या यादव यांनीही या मदतीबद्दल विराट कोहलीचे आभार मानले. तसेच हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने ५ लाख रुपयांची मदतही केली होती. आई-वडीलाना कोरोनाची लागण झाल्यानंतर श्रावंतीने उपचारांसाठी आधीच १६ लाख रुपये खर्च केले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!