🕒 1 min read
औरंगाबाद : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ‘ब्रेक दि चेन’च्या कडक निर्बंधांची अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिकेने आता स्वतंत्र दहा पथके तैनात केली आहेत. हि पथके शहरात फिरून पोलीसांना मदत करणार आहेत. लॉकडाऊनचे नियम तोडणाऱ्यां विरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी शनिवारी (दि.२२) दिले.
संचारबंदीचे शेवटचे दहा दिवस उरले आहेत. त्यामुळे यात दहा पथकांची वाढ करुन मनपा आणि पोलीस प्रशासन अधिक सक्तीने विनाकारण फिरणाऱ्यांची तपासणी, कारवाई करत आहे. लसीकरण, कडक निर्बंध, नागरीकांची स्वयंशिस्त यामुळे शहरातील रुग्णसंख्या कमी झाली असली तरीही तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर गाफील राहून चालणार नाही. यासाठी अधिक सक्तीने या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
त्यामुळे आता शहरात लॉकडाऊनच्या काळात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी महानगरपालिकेने कडक पाऊले उचलली आहेत. ब्रेक द चेनची अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिकेने स्वतंत्र दहा पथके तैनात केली आहेत. हे पथक पोलिसांना मदत करणार आहे. मास्क न लावणे, दिलेल्या वेळेनंतर दुकाने सुरू ठेवणे, लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जाणार आहे.
ब्रेक दि चेन संदर्भात महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय म्हणाले की ब्रेक दि चैन ही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आहे. गेल्या महिन्यापासून पोलीस व महानगरपालिका कर्मचारी ब्रेक दि चैन ची अंमलबजावणी करीत आहे. आपल्याकडे लॉकडाऊनचे नऊ ते दहा दिवस बाकी आहेत. या दिवसात चांगल्या प्रकारे लॉकडाऊनची अंमलबजावणी केली तर शहरात कोरोनाची साखळी तुटणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमाचे पालन करून कोरोनाला रोखण्यासाठी सहकार्य करावे असेही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- पथके वाढताच विनाकारण फिरणाऱ्यांची संख्याही वाढली!
- दिलासादायक! औरंगाबादेत ‘इतके’ कोविड सेंटर्स झाले बंद
- आता आणखी एका जिल्ह्यातील कडक लॉकडाऊन शिथिल !
- विरोधक ब्लॅक फंगस आहेत, शिवसैनिकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं – संजय राऊत
- कैलासनगर स्मशानभूमीसह एन-६ स्मशानभूमीत गॅस दाहिनी उभारणार!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

