Share

कैलासनगर स्मशानभूमीसह एन-६ स्मशानभूमीत गॅस दाहिनी उभारणार!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेने शहरातील कैलासनगर स्मशानभूमीत गॅस दाहिनी उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली. त्याच दरम्यान वाळूजमधील उद्योजकांनी स्थापन केलेल्या फस्ट संस्थेने पुढाकार घेत कैलासनगर स्मशानभुमीत गॅस दाहिनी उभारण्यात पुढाकार घेतला. त्यामुळे पालिकेने कैलासनगर स्मशानभूमिसाठी राबलेली निविदा प्रक्रिया रद्द केली. त्याऐवजी आता जकात नाका सिडको एन-सहा स्मशानभुमीत गॅस दाहिनी उभारण्यात येणार आहे. त्याची निविदा प्रक्रिया लवकरच राबवली जाणार आहे.

औरंगाबाद शहरात दिवसेंदिवस मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यातच कोरोना संसर्गामुळे रुग्णांचे मृत्यू मोठया संख्येने होत आहेत. यामुळे त्यांच्यावर तातडीने अंत्यसंस्कार होणे गरजेचे आहे. शहरासह बाहेरच्या जिल्हयासह गावागावातील कोरोनाबाधित रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार केले जातात. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्यास बाहेरगावी मृतदेह घेऊन जाण्यास बंदी आहे. त्यामुळे त्यावर शहरातील स्मशानभूमीतच अंत्यसंस्कार करावे लागतात. शहरातील स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यासाठी लागणारा वेळ वाचविण्याच्या हेतूने गॅस दाहिनी उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

कैलासनगर स्मशानभुमीत पालिकेने गॅस दाहिनी उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली. त्या दरम्यान वाळूजमधील उद्योजकांच्या फस्ट संस्थेने पुढाकार घेऊन कैलासनगर स्मशानभूमित गॅस दाहिनी उभारण्यासाठी पालिकेसोबत सामंजस्य करार करुन कामाला सुरूवात केली. त्यामुळे पालिकेने राबवलेली निविदा प्रकिया रद्द केली. त्यामुळे आता जकातनाका येथील सिडको एन-सहा स्मशानभूमित अंत्यसंस्कारासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन या ठिकाणी मोकळया जागेत गॅस दाहिनी उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. राज्य सरकारकडून मिळालेल्या अनुदानातून ही ठिकाणी गॅस दाहिनी उभारली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!