Share

वादळाच्या संकटाची फोटोशूटसाठी संधी घेण अभिनेत्रीला पडलं महागात…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: संपूर्ण देशात सध्या कोरोनाचे मोठे संकट आहे. रुग्ण संख्या वादती असल्याने चिंता वीट केली जात आहे. यातच अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक सेलिब्रिटी या काळात मदतीसाठी पुढे येत आहे. राज्यात एकीकडे कोरोनाच संकट तर दुसरी कडे तौतै चक्रीवादळाचे संकटअशा स्थितीचा लोक सामाना करत असताना ‘दिया और बाती’ फेम अभिनेत्री दीपिका सिंहने मुंबईत रस्त्यावर पडलेल्या झाडांसमोर डान्स  करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामुळे सोशल मिडियावर नेटकऱ्यांनी तिला चांगलेच सुनावले आहे.

https://www.instagram.com/p/CPARk2uhj9O/?utm_source=ig_web_copy_link

तौते वादळामुळे अनेक ठिकाणी झाड उन्मळून पडली होती. अनेक ठिकाणी यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे.  असे असताना अभिनेत्री दीपिका सिंहने संधी साधत घरासमोर पडलेल्या एका मोठ्या झाडासमोर फोटोशूट केलं. तसचं एक डान्सचा व्हिडीओ शेअर केला. तसेच झाडांसोबत तिने वेगवेगळ्या पोझ देत फोटोशूट केलंय. या पोस्टला तिने “झाडांमध्ये” अस कॅप्शन दिलंय.  व्हिडीओ शेअर दीपिका कॅप्शनमध्ये म्हणाली, “तुम्ही वादळाला शांत नाही करू शकतं त्यामुळे प्रयत्न करणं थांबवा. तुम्ही स्वत:ला शांत ठेवा. निसर्गाशी प्रेम करा आणि त्याच्या मूड सहन करायला शिका. एक दिवस हे वादळ नक्की जाईल.” असं ती कॅप्शनमध्ये म्हणालीय.

मुंबईत आलेल्या या वादळामुळे काही लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक लोकांचे यात नुकसान झाले आहे. काही जणांच्या पोटा -पाण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. आपल्याच भागातील अनेक लोक या संकटामुळे निराश आहेत. असे असताना आनंद कसं  काय व्यक्त केला जाऊ शकतो. वादळात डान्स करण हा तीचा मूर्खपणा असल्याचे अनेक नेटकऱ्यांनी तिला म्हंटल आहे.  तर दीपिकाने या आलेल्या आपत्तीची फोटोशूटसाठी संधी घेतल्याचं म्हणत अनेकांनी तिला ट्रोल केल आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!