🕒 1 min read
मुंबई : गुजरात आणि महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांना नुकताच तौक्ते चक्रीवादळाने तडाखा दिला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात आणि दिवला भेट देऊन तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहे. भावनगर, उना, दिव,जाफराबाद आणि महूआ या भागाची हवाई पाहणी देखील पंतप्रधान करणार असून अहमदाबाद इथं आढावा बैठक घेणार आहेत.
दरम्यान तौक्तेमध्ये गुजरातमधील २७ जणांनी जीव गमावल्याचे वृत्त आहे. गुजरातमधील किनारी भागात या वादळामुळे मोठे नुकसान झाले असून, इथले वीजेचे खांब, मोठाले वृक्ष आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवाय इथल्या रस्त्यांचेही नुकसान झाल्यी माहिती समोर येत आहे.
तौक्ते चक्रीवादळामुऴे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मोठं नुकसान झालं. अनेक ठिकाणी झाडे आणि विजेचे खांब पडले आहेत. घराचं नुकसान झालं आहे. दरम्यान, आता मोदींच्या दौऱ्यावरून आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी एक ट्वीट करून मोदींवर टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ताऊक्ते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. आमच्या कोकणातही प्रचंड नुकसान झाले आहे. मग महाराष्ट्र दौऱ्यावर ते का येत नाहीत? महाराष्ट्राबद्दल एवढा आकस का? असो, मविआ सरकारने कोकणवासीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 19, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी तौक्ते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. आमच्या कोकणातही प्रचंड नुकसान झाले आहे. मग महाराष्ट्र दौऱ्यावर ते का येत नाहीत? महाराष्ट्राबद्दल एवढा आकस का? असो, मविआ सरकारने कोकणवासीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे असे सावंत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मोदींच्या दौऱ्यावर राष्ट्रवादीने देखील टीका केली असून महाराष्ट्रातही तोक्ते वादळ आले मग महाराष्ट्राबाबत पंतप्रधान भेदभाव का करत आहेत असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी तोक्ते वादळाने नुकसान झालेल्या दीव-दमण आणि गुजरातचा हवाई दौरा करणार आहेत. महाराष्ट्रात तोक्ते वादळ येऊन नुकसान करुन गेले आहे मग महाराष्ट्राचा दौरा पंतप्रधान का करत नाहीत. महाराष्ट्राबद्दल असलेल्या या भेदभावाबद्दल नवाब मलिक यांनी ट्वीट करत सवाल उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- खतांच्या वाढत्या किंमती विरोधात बच्चू कडू आक्रमक, ताली थाली बजाव आंदोलन करणार
- दिलासादायक : करोना विषाणू 99.99 टक्के नष्ट करणारी थेरेपी विकसीत करण्यात वैज्ञानिकांना आले यश
- ‘गुजरातमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी करणारे पंतप्रधान महाराष्ट्राचा दौरा का करत नाहीत?’
- ‘आघाडी सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक; आरक्षणासाठी फेरविचार याचिकेला दिरंगाई का?’
- कोरोनावर रेमडेसीवीर प्रभावी नाही, उपचारपद्धतीतून हटविण्याचे संकेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
