Share

“तो ‘केम छो वरळी’ विचारणारा आमदार कुठे आहे?” राणेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गेल्या वर्षी निसर्ग वादळाने महाराष्ट्राला दणका दिल्यानंतर आता ‘तौक्ते’ चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे. गोव्याकडून आलेलं हे वादळ जरी कोकण किनारपट्टीच्या बाजूने सरकलं असलं तरी कोकणातील गावांसह पश्चिम महाराष्ट्रात देखील सोसाट्याचा वारा व मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान केलं आहे. हे चक्रीवादळ काल मुंबई किनारपट्टीच्या बाजूने गुजरातच्या दिशेने पुढे गेलं.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, पालघर यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान झालं आहे. तर, एकाबाजूला खवळलेला समुद्र आणि दुसरीकडे मुसळधार पाऊस यामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचले होते. या परिस्थितीवरून भाजप नेते निलेश राणे यांनी पर्यावरण मंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

त्यांनी ट्विटसोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये नागरिक गुडघाभर पाण्यामधून वाट काढत असल्याचं दिसत आहे. नेहमीची येतो पावसाळा या म्हणीप्रमाणे पाणी तुंबणे, खड्डे पडणे हे काही मुंबईकरांसाठी नवं नाही. मात्र, यंदा मान्सून सुरु होण्याआधीच चक्रीवादळामुळे हि स्थिती पाहायला मिळत असून मुंबई महापालिकेच्या तयारीची ‘पोलखोल’ केली आहे.

यामुळेच निलेश राणे यांनी, “हे चित्र वरळी मतदारसंघाचं आहे. वरळीकर विचारतायत तो ‘केम छो वरळी’ विचारणारा आमदार कुठे आहे? ती मुंबई पॅटर्नची पतंग कुठे गेली? एका पावसात वरळी पॅटर्न लोकांना दिसलं, सगळीकडे थुकपट्टी करून चालत नाही” अशा शब्दांत आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!