Share

‘माही सरांसारख्या खेळाडूकडून काही शिकणं म्हणजे… ‘; भारतीय महिला क्रिकेटरला धोनीची शिकवणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : किही दिवसापुर्वी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्याची घोषणा करण्यात आली. इंग्लंड दौऱ्यात कसोटी, एकदिवसीय आणि टी ट्वेन्टी अशा तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताला इंग्लंडशी दोन हात करायचे आहेत. यासाठी संघ जोरदार मेहनत देखील घेत आहे. या दौऱ्यात महिला क्रिकेट संघासोबत नवनिर्वाचीत प्रशिश्रक रमेश पोवार हे असणार आहेत. यापुर्वी रमेश पोवारने २०१८ साली भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदाची धुरा संभाळली होती.

भारतीय महिला क्रिकेट संघातील झारखंडची विकेट कीपर फलंदाज इंद्राणी रॉयने कॅप्टन कूल एम एस धोनीकडून क्रिकेटचे धडे घेतले आहेत. माही सरांच्या मार्गदर्शनाचा मला इथून पाठीमागे फायदा झालाय आणि आताही इंग्लंड दौऱ्यात त्यांनी सांगितलेल्या टिप्सचा मला फायदा होईल, असा विश्वास इंद्राणी रॉयने यावेळी व्यक्त केला आहे.

धोनीकडून प्रत्येक खेळाडू मार्गदर्शन मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याने क्रिकेटमधल्या काही मोलाच्या गोष्टी सांगाव्यात, यासाठी प्रत्येक नवीन खडूचा प्रयत्न असतो. इंग्लंड दौऱ्यासाठी जात असलेल्या इंद्राणी रॉयला धोनीकडून मार्गदर्शन मिळालंय. रांचीमध्ये ट्रेनिंग सेशनदरम्यान माहीने इंद्राणीला खास टिप्स दिल्यात. ज्याचा फायदा ज्याचा फायदा तिला इंग्लंड दौऱ्यावर होणार असल्याचा विश्वास इंद्राणीने व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!