Share

सावध ! सोनू सूदचं चाहत्यांना सतर्कतेचं आवाहन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यासह देशभरात गेल्यावर्षी पासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस जनजीवन सुरळीत होत असतानाच यावर्षाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातला आहे. अशा परिस्थितीत सोनू सूद पुन्हा एकदा मदतीसाठी पुढे आला आहे. कोरोनाच्या सध्याच्या महाभयंकर लाटेत सोनू लोकांचे जीव वाचवताना दिसतोय. मात्र आता काहीजन त्याच्या नावाचा वापर करून पैसे उकळण्याचे धंदे करत आहेत.

सोनू सूदने याबाबत स्वतः सोशल मीडियावर माहिती दिली व अशा लोकांपासून सावध राहण्याचे आवाहन देखील केले आहे. सोनूने स्वखर्चातून मजूरांना आपल्या घरी जाण्याची सोय मागील वर्षी लॉकडाउन मध्ये केली होती. यावेळी सोनूने त्याच्या संस्थे मार्फत आणखीही काही सामाजिक कार्य करायला सुरू केली.

यावर्षी आता सोनू सूद कोरोनाग्रस्तांना दिवस रात्र सेवा देत आहे. बेड्स, ऑक्सिजन मिळवून देताना दिसत आहे. त्याच्या या कार्याला अनेक संस्थां देखील सपोर्ट करत आहेत. पण यातील कोणत्याही मदती साठी कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जात नाही. असं त्याने वेळोवेळी सांगितलं आहे. पण त्याच्या नावाचा अनेकजन गैरफायदा घेत असल्याचं समेर आलं आहे.

सोनूने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोत सोनूचं नाव आणि फोटो वापरून त्यावर पैसे दान करण्याचं आवाहान केलं आहे. तर त्यावर एक नंबर देखिल देण्यात आला आहे. व त्या नंबरवर पैसे पाठवण्यासाठी आवाहन केलं आहे. पण सोनूने हा फोटो पोस्ट करत हा फसवेगिरीचा धंदा असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे सोनूच्या नावाचा गैरवापर केला जात आहे हे समोर येत आहे. यामुळे सोनूने अशा लोकांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!