Share

आर अश्विनकडून नकळत झाली मोठी चूक ; सोशल मीडियावर मागितली सर्वांची माफी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय संघाचा फिरकीपटू आणि आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सचा हुकमी एक्का आर. अश्विनच्या कुटुंबावर मध्यंतरी कठीण परिस्थिती ओढावली होती. अश्विनच्या कुटुंबातील १० जणांना कोरोनाची लागण झाली होती. दुर्दैवाची गोष्ट यामध्ये ४ लहान मुलांचाही समावेश होता. अश्विनची पत्नी प्रिती नारायणन हिने ट्विट करुन कुटुंबावर ओढावलेली कठीण परिस्थिती सांगितली होती.

आर अश्विननच्या कुटुंबातील ६ मोठे तर ४ मुलं अशा १० जणांना मिळून कोरोनाची लागण झाली होती. यानंतर आर अश्विन सातत्यानं सोशल मीडियावरून कोरोना संदर्भात जनजागृती करताना दिसत आहे. पण, रविवारी त्यानं एक चूकीचं ट्विट केलं. त्यानं ट्विटमध्ये लोकांची गर्दी जमलेला फोटो पोस्ट करून नाराजी व्यक्त केली होती आणि सर्वांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करा असं आवाहनही केलं होतं. पण, त्यानं सोमवारी एक ट्विट करून आपली चूक मान्य केली.

त्यानं ट्विट केलं की, ”काल मी एक फोटो पोस्ट केला. त्यात रेशन दुकानाबाहेर गर्दी जमल्याचे मी सांगितले होते. पण, मी माफी मागतो. ती गर्दी औषधांसाठी झाली होती. प्रत्येकाला आपल्या प्रियजनाची काळजी होती आणि त्यापोटी त्यांची ती धडपड होती. तरीही कृपया करून अशी गर्दी करणं टाळा. असे ट्विट करून त्याने पुन्हा माफी मागितली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!