Share

तौक्तेचा परिणाम, नाथसागर जलाशयात हजारो माशांचा अचानक मृत्यू!

Published On: 

🕒 1 min read

पैठण : रविवारी सायंकाळी नाथ सागर जलाशयात साखळी क्रमांक ८० ते८५ या दरम्यान हजारोंच्या संख्येने विविध प्रकारचे मासे अचानक मृत्यू मुखी पडल्याचे दिसून आले. यामुळे एकच खळबळ उडाली असून मासे गोळा करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. मासे नेमके कशामुळे मृत्यूमुखी पडले हे कळू शकले नाही. मात्र या माशांमुळे नागरिकांना रविवारी चांगलीच मेजवानी मिळाली. तौक्ते वादळामुळे तर हे मासे मृत्युमुखी पडले नाही ना असा सवाल उपस्थित होत आहे.

नाथ सागर जलाशयाच्या उत्तर बाजूस साखळी क्रमांक ८०ते ८५ या दरम्यान सायंकाळी साडेपाच ते सहावाजेच्या दरम्यान पाण्यात अचानक मासे किनाऱ्यावर येऊन धडकु लागले. या मध्ये वाम, मोठे झिंगे, जलवा, पापलेट, टीलापी, चुचीचे मासे, मुरी वाम, चिंगल्या, भतका, कढई या विविध प्रकारच्या माशांचा यात समावेश होता.

मासे किनाऱ्यावर येऊ लागल्याचे दिसताच नागरिकांची मासे गोळा करण्यासाठी झुंबड उडाली. माशांची पारख असलेल्या नागरिकांनी मोठे झिंगे, वाम, जलवा आदी बिन काट्याचे मासे गोळा करून घरी नेले. रविवार असल्याने या खवय्यांची चांगलीच मेजवानी झाली. मात्र हे मासे कशामुळे मेले असतील याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे. दरम्यान हवामानात अचानक बदल झाल्यास माशांना रिएक्शन येते भुरळ येते ते भुरळ येऊन मृत्युमुखी पडतात असे बोलले जात आहे. त्यामुळे तौक्ते वादळाचाच हा परिणाम असावा. अशी शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!