Share

तौक्ते वादळ हे राष्ट्रीय वादळ, त्याने महाराष्ट्राचा नाद करू नये : अमोल मिटकरी

Published On: 

🕒 1 min read

पुणे : गेल्या वर्षी निसर्ग वादळाने महाराष्ट्राला दणका दिल्यानंतर आता ‘तौक्ते’ चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे. काल गोव्याकडून आलेलं हे वादळ जरी कोकण किनारपट्टीच्या बाजूने सरकलं असलं तरी कोकणातील गावांसह पश्चिम महाराष्ट्रात देखील सोसाट्याचा वारा व मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान केलं आहे.

आज हे चक्रीवादळ मुंबई किनारपट्टीच्या बाजूने गुजरातच्या दिशेने पुढे गेलं आहे. आज सकाळपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. एकाबाजूला खवळलेला समुद्र आणि दुसरीकडे मुसळधार पाऊस यामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचलेआहे. दरम्यान, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, पालघर यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान झालं आहे. आता हे वादळ गुजरातच्या दिशेने पुढे जात असून वाऱ्याचा वेग हा ताशी १८० किलोमीटर पर्यंत वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी तौक्ते वादळालाही राजकीय रंग देण्याच्या प्रयत्नात अजब विधान केलं आहे. केंद्र सरकारसह भाजपच्या नेत्यांवर टीका करण्याच्या प्रयत्नात त्यांनी तौक्ते वादळालाच आव्हान दिलं आहे. ‘तौक्ते वादळ राष्ट्रीय वादळ आहे. त्याने महाराष्ट्राचा नाद करू नये. राष्ट्रीय स्तरावरील वादळ असल्यामुळे याची चिंता दिल्लीश्वरांनी करावी. छ. शिवरायांचे राज्य असे अनेक वादळ परतून लावतो. ती हिम्मत दिल्लीश्वर व इथल्या 106 शिपायांमध्ये नाही,’ अशी टिप्पणी अमोल मिटकरी यांनी ट्विटद्वारे केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!