🕒 1 min read
मुंबई : अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘तौत्के’ चक्रीवादळाचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवत आहे. मुंबईत सकाळपासून जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळत आहेत. दर तासाला अधिक सक्रीय होणारे हे चक्रीवादळ सध्या गुजरातच्या दिशेने सरकत आहे. कोकण किनारपट्टीला समांतर वाटचाल करत असेलल्या तौत्के चक्रीवादळानं गती घेतल्यामुळं त्याचा फटका रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यालगत असणाऱ्या राजापूर, रत्नागिरी तालुक्यातील जवळपास सगळ्या गावांना बसलाय आहे.
तौत्क चक्रीवादळ कोकण किनारपट्टीसह मुंबई जवळून प्रवास करणार आहे. त्यामुळे किनारपट्टीभागात प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या कंट्रोल रुममध्ये पोहोचून आढावा घेतला. मुंबईकरांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी यावेळी केले आहे.
आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेतला. त्याचबरोबर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महत्वाच्या सूचनाही केल्या. वादळाची तीव्रता सायंकाळ किंवा रात्रीपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ ११४ किमीच्या वेगाने रेकॉर्डब्रेक करत मुंबईवर आदळले आहे. हे आतापर्यंतचे सर्वात मोठे चक्रीवादळ असून झालेल्या परिणामांचा आणि सद्यस्थितीचा आढावा घेत अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी यावेळी केले आहे.
दरम्यान, हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार, चक्रीवादळाचा प्रभाव मुंबई आणि किनारपट्टी भागावर राहणार, मुसळधार आणि अतिमुसळधार पाऊस काही ठिकाणी कोसळणार, पुढच्या 24 तासात उत्तर कोकणात पाऊस, दक्षिण कोककणात ढगाळ वातावरण असेल, मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्या काही ठिकाणी पाऊस कोसळेल अशी माहिती सध्या मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पिंपरी-चिंचवडमध्ये म्युकरमायकोसिसचा धोका वाढला; वायसीएममध्ये १२ रुग्णांचा मृत्यू
- ‘…तर रक्तरंजित लढाईला तयार राहा’; शिवसेना आमदाराचाच ठाकरे सरकारला इशारा
- भाजपचे आरोप खोटे; अजितदादांनी सांगितलं भारत बायोटेकला पुण्यात जागा देण्याचं कारण
- ‘मी गोमूत्र पिते, त्यामुळेच मला कोरोना झाला नाही’, भाजप खा.साध्वी प्रज्ञा सिंह यांचा दावा
- पुणेकरांनी करून दाखवलं ! नव्या कोरोनाबाधितांची संख्या तीन अंकी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
