Share

‘मोदींचा सर्टिफिकेटवरील फोटो हटवणार नाही,आम्हाला स्वतंत्र अ‍ॅप तयार करण्याची जबाबदारी द्या’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – राज्यासह देशभरात कोरोना लसीकरणाचा मुद्दा चर्चेत आहे. लसीकरण कण्यासाठी नोंदणी आवशयक असून ज्या कोविन अ‍ॅपद्वारे नोंदणी केली जाते त्याबद्दल अनेक तक्रारी येत आहेत. या सर्व प्रकारचा जनतेला मोठा त्रास होत असून राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील होत आहेत.

केंद्रसरकारला वाटत असेल की, आम्ही सर्टिफिकेटवरील पंतप्रधानांचा फोटो हटवू पण आम्ही आश्वासन देतो की, सर्टिफिकेटवरील फोटो तसाच राहिल परंतु आम्हाला स्वतंत्र अ‍ॅप तयार करण्याची व नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

कोविन अ‍ॅपवर रजिस्टर करून लस दिली जात आहे. परंतु हे अ‍ॅप वारंवार डाऊन होत आहे त्यामुळे रजिस्टर केलेल्या लोकांना त्रास सहन करावा लागत आहेच शिवाय लोकांना रजिस्टर करायला अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे राज्यसरकारला हे अ‍ॅप तयार करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केंद्राकडे करण्यात आली असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

केंद्रसरकारने ही परवानगी दिली तर या अ‍ॅप आणि इतर माध्यमातून लोकांच्या नोंदी घेऊन लस देण्यात सुलभता येईल. परंतु केंद्रसरकारने अजूनही परवानगी दिलेली नाही असेही नवाब मलिक म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!