🕒 1 min read
मुंबई : भारतात सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत कोरोनाने शिरकाव केल्याने स्पर्धा अर्ध्यातच स्थगीत करावी लागली. आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यानंतर विदेशी खेळाडू हे मायदेशी परत गेले आहेत. तर भारतीय खेळाडू स्वगृही परतले आहेत. आयपीएल स्थगित झाल्यामुळे दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा मुंबईकर पृथ्वी शॉ मुंबईहून गोव्याला जायला निघाला.
मात्र गोव्याला जात असताना त्याच्याकडे ई-पास नव्हता. आंबोलीला पोहोचल्यावर पोलिसांनी त्याला अडवलं आणि ई-पासबद्दल विचारलं. ई-पास नसल्यामुळे पृथ्वी शॉ गोंधळला. त्याच्याकडे पास नसल्याने त्याला अडवण्यात आले आणि तिथेच थांबवले. विणापास सोडण्यास पृथ्वीने विनंतीही केली, पण पोलिसांनी त्याला सोडायला नकार दिला. अखेर पृथ्वी शॉने त्याच्या मोबाईलवरून पास काढला. एका तासानंतर पृथ्वी शॉला पास मिळाला आणि तो गोव्याकडे जायला निघाला.
दरम्यान, नुकत्याच इंग्लंड दौऱ्यासाठी जाहीर झालेल्या कसोटी संघात नवीन खेळाडूंना संधी दिली आहे. महत्वाची बाब म्हणजे पृथ्वी शॉला डावलून नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. विजय हजारे ट्रॉफी पासून फॉर्मात असलेला पृथ्वी शॉला मात्र संघात स्थान मिळाले नाही.
महत्वाच्या बातम्या
- केंद्राने कातडी बचाव धोरण स्वीकारू नये, अशोक चव्हाण यांचा घणाघात
- मोठी बातमी : मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारकडून सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल
- …तर ‘त्या’ सेलिब्रिटींनी समोर येऊन सांगावं दबाव टाकला जातोय; शिवसेनेचं प्रत्युत्तर !
- गडकरींनी शब्द पाळला; वर्ध्यात निर्मित झालेल्या रेमडेसिवीरचा पहिला स्टॉक बाहेर !
- महाराष्ट्र जिंकणार…! रिकव्हरी रेट ८८.३४ टक्के तर आजही ५० हजारांहून अधिक कोरोनामुक्त


