🕒 1 min read
पुणे – अजित पवारांच्या सोशल मीडियासाठी वर्षाला 6 कोटींचा निधी राखीव ठेवण्यात आला असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर पवार यांच्यावर चौफेर टीका होत आहे. राज्यात कोरोना महामारीनं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार पडला आहे.अशातच सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी यासंदर्भातील आदेश जारी केल्याने सरकारवर मोठी टीका होत आहे.
दरम्यान, चौफेर टीका होऊ लागल्यानंतर आता उपमुख्यमंत्री कार्यालयाचा सोशल मिडीया सांभाळण्यासाठी बाह्ययंत्रणा नियुक्त करण्याची बिलकूल गरज नाही, यासंदर्भातील शासननिर्णय तात्काळ रद्द करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. पवार यांनी हे आदेश दिले असले तरीही टीका सुरूच असल्याचे चित्र आहे.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी या सर्व प्रकारावर शेलक्या शब्दात टीका केली आहे. कोरोना महामारी स्मशानभूमीत सुद्धा लोकांच्या रांगा लागलेल्या आहेत. लोकं घाबरून मरत आहे. लोकांना सरकारकडून योग्य उपचार वेळेत मिळत नाहीत. राज्यात शंभर कोटी वसुली पासून प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार माजलेला आहे. पांढरपेशांकडून पैशांची सक्त-वसुली होत आहे. लोकांना त्रास देऊन नेते, अधिकारी मस्तवाल होत चालले असून कदाचित ही सरकारचीच कृपा आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सामान्य माणसाचं मरण दररोज सुरू आहे. तुमचं तोंड दिसण्यासाठी सोशल मीडिया साठी वर्षाला ६ कोटी खर्च करणार… हा ‘निर्लज्जम सदासुखी’ प्रकार असल्याची टीका शिंदे यांनी केली आहे.
शिंदे म्हणाले,पवार-ठाकरे यांच्या सरकारच्या आशीर्वादाने हॉस्पिटलच्या दारात माणसं तडफडून मरत आहेत. आरोग्य व्यवस्था त्यांना योग्य उपचार देऊ शकत नाही. ऑक्सीजन बेड, व्हेंटिलेटर बेड किंवा इंजेक्शन हे पेशंटला वेळेवर मिळत नाही. इंजेक्शन पासून प्रत्येक गोष्टीचा काळाबाजार होत आहे. पैसे देऊन एजंट बेड उपलब्ध करून देतात एवढी भयानक लूट होत असताना मृत्यूचा आकडा आजही सर्वात जास्त आहे. महाराष्ट्र संकटात आहे आणि तुम्ही लोकांच्या मढ्यावर च्या टाळूवरचं लोणी चाटून खातात हे दुर्दैवी असून हे फसवं सरकार आहे. वाझे व देशमुखच्या 100 कोटीतून अजित दादांनी सोशल मिडियावर खर्च करावा असा खोचक सल्ला देखील त्यांनी दिला आहे.
अजित दादा… तुमची हुकुमशाही जास्त दिवस चालणार नाही. जनतेचा टॅक्स रुपी पैशावर महाराष्ट्र सरकार फालतू खर्च करण्यासाठी दरोडा टाकणारा असेल जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही. सोशल मीडियावर जाहिरात करण्यापेक्षा लोकाला जगायला काहीतरी उपलब्ध करून द्या. लोकांच्या खिशावर दरोडा टाकायचे धंदे बंद करा. महाराष्ट्रातील जनता अत्यंत संकटात आहे. लक्षात ठेवा, सामान्य लोकांचा या सरकारला तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात पवार यांच्यावर शिंदे यांनी हल्ला चढवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘देश फक्त 6 महिन्यांसाठी पुन्हा एकदा डॉ. मनमोहन सिंगांच्या हाती द्या’
- अमरावतीत दोन डॉक्टरांकडून रेमडेसिवीरचा काळाबाजार, सहा जण अटकेत
- ‘कोरोना लसीसाठी पैसे नाही म्हणणारे सोशल मीडियावर 6 कोटी खर्च करत आहेत’
- जालन्यातील तरुणीचा लग्नाच्या नावाखाली मालेगावच्या तरुणाला पाच लाखांचा गंडा
- देशात तीनच कंपन्यांना परवानगी असताना Moderna ची लस कशी काय दिली जातेय ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

