🕒 1 min read
मुंबई : कोरोनावर मात करण्यासाठी देशातील अधिका-अधिक नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धास्तावलेल्या जनता लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत आहे. मात्र, एकीकडे कोरोनाचा वाढता धोका तर दुसरीकडे लसींचा तुटवडा यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
लसींचा तुटवडा असल्याने मोजक्याच ठिकाणी लसीकरण केले जात आहे. तर, नोंदणी केल्यानंतरच लसीकरण होत असले तरी साठा उपलब्ध झाला नसल्याचे कारण लसीकरण केंद्रावर दिले जात असल्याने अनेक नागरिकांना विना लसीकरणच माघारी यावं लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने देशभरातील कोरोना लसीकरणाच्या मोहिमेला ब्रेक लागला होता. मात्र, आता पुन्हा नव्या जोमाने कोरोना लसीकरण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसे संकेतच केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिले आहेत.
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी आठ राज्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी या महिन्यातच 8 कोटी व्हॅक्सिनचे डोस उपलब्ध होणार असल्याचं सांगितलं. तसेच जूनमध्ये 9 कोटी डोस मिळतील, असं त्यांनी स्पष्ट केले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार देशात आतापर्यंत 17.52 कोटी लस देण्यात आल्या आहेत. बुधवारी सकाळी 7 वाजेच्या रिपोर्टनुसार 25,47,534 सत्रांसाठी 17,52,35,991 डोस देण्यात आले आहेत. यात 95,82,449 आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस आणि 65,39,376 कामगारांना दुसरा डोस देण्यात आला. त्याशिवाय 45 ते 60 वयोगटातील 5,58,83,416 व्यक्तिंना पहिला डोस आणि 78,36,168 लोकांना दुसरा डोस देण्यात आला. तर ज्येष्ठ नागरिकांना 5,39,59,772 पहिला डोस आणि 1,62,88,176 ज्येष्ठ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत 24.4 लाखाहून अधिक लस देण्यात आली. लसीकरणाच्या116 व्या दिवशी (11 मे रोजी) 24,46,674 डोस देण्यात आले.
दरम्यान, महाराष्ट्रात सध्या लसीच्या या तुटवड्यामुळे राज्य शासन एक महत्वाचा निर्णय घेणार आहे. राज्यात 1 कोटी 84 लाख लसीकरण झाले आहे. आता 35 हजार कोव्हॅक्सिन उपलब्ध आहे. राज्य शासनाने खरेदी केलेली ३ लाख कोव्हॅक्सिन 45 वर्षांवरील व्यक्तींना दुसरा डोस देणे गरजेचं आहे. त्यामुळे हे डोस 45 पुढील वयोगटांना दिले जाणार आहे. असा निर्णय घेणार असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुकेश खन्ना यांनी आपल्या निधनाची अफवा पसरवऱ्यांना चांगलेच सुनावले
- ‘पुण्यात कोरोनाची लाट ओसरल्याचे चित्र असले, तरी आपण आता गाफील राहणार नाही’
- ‘शिवसेना पक्षप्रमुख आघाडीत गेल्यावर कसे बदलले, हे आता जनतेला माहीत झालं आहे’
- ‘राज्यपालांना केवळ एक निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत पुन्हा जबाबदारी टाळली’
- ऑक्सिजन एक्स्प्रेस पुण्यातील लोणीत दाखल; ३७ तासांत कापले १ हजार ७२५ किमी अंतर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

