परतूर – मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आपण लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत दिली. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळानं आरक्षणाच्या प्रश्नाबाबत काल राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.
मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींकडे आहे असं सर्वोच्च न्यायालयाने याबाबत निकाल देताना म्हटलं होतं. या निकालावर आमच्या भावना कळविण्यासाठी राज्यपालांची भेट घेतली असून, लवकरच यासाठी पंतप्रधानांचीही भेट घेणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
या शिष्टमंडळात मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आदी नेत्यांचा सहभाग होता.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना मराठा आरक्षण कायदा सर्व पक्षांच्या संमतीने पारित झाल्याचे त्यांनी म्हंटले पण नंतर हा कायदा फुलप्रूफ नव्हता असे म्हणत भाजपाला लक्ष्य करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यावरूनच आता आरोप प्रत्यारोप देखील होत आहेत.याच मुद्द्यावरून आमदार बबनराव लोणीकर यांनी सरकारवर तोफ डागली आहे.
लोणीकर म्हणाले, २ मिनिटात २ परस्पर विरोधी भूमिका कशा हो मांडता? एकतर मराठा आरक्षण कायदा ‘एकमताने केलेला व योग्य’ आहे,असं तरी म्हणा किंवा कायदा ‘टिकणारा नव्हता’ असं तरी म्हणा! युतीत असताना एक बोलणारे शिवसेना पक्षप्रमुख आघाडीत गेल्यावर कसे बदलले, हे आता जनतेला माहीत झालं आहे अशी टीका त्यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पुण्यात कोरोनाची लाट ओसरल्याचे चित्र असले, तरी आपण आता गाफील राहणार नाही’
- ‘अजितदादा 3 महिन्यापूर्वी मला म्हणाले होते, आमचं ठरलंय मराठ्यांना ओबीसी मध्ये घ्यायचं नाही’
- ‘राज्यपालांना केवळ एक निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत पुन्हा जबाबदारी टाळली’
- ऑक्सिजन एक्स्प्रेस पुण्यातील लोणीत दाखल; ३७ तासांत कापले १ हजार ७२५ किमी अंतर
- ‘गंगेच्या किनारी विखुरलेल्या अवस्थेत पडलेले मृतदेह पाहून मनाला खूप वेदना झाल्या…!’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

