मुंबई : दिग्गज अभिनेते मुकेश खन्ना यांनी ‘शक्तिमान’ आणि ‘भीष्म पितामह’ सारख्या दमदार भूमिका साकारल्या आहेत. मुकेश खन्ना यांच्या ‘शक्तिमान’ या भुमिकेमुळे ते लहान मुलांमध्ये खूपच लोकप्रिय ठरले. मात्र सध्या त्यांची एक वेगळीच कारणांमुळे चर्चा सुरू झाली आहे. मुकेश खन्ना यांचे निधन झाले असल्याची अफवा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर मुकेश खन्ना यांनी भाष्य करत ही माहिती खोटी असल्याचे सांगितले आहे.
https://www.instagram.com/p/COvRL8DpkYp/?utm_source=ig_web_copy_link
निधनाच्या माहितीची सत्यता न पडताळता अनेक लोकांनी त्यांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांणजली वाहिली. यामुळे अभिनेता मुकेश खन्ना चिंतित होते. मात्र आता त्यांनी या वृत्तला पूर्णविराम दिला आहे. यानंतर मुकेश यांनी एक व्हिडिओ पोस्ट करून त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे संगितले या सोबतच त्यांनी अश्या खोट्या अफवा पसरवणार्या लोकांना चांगलेच खडेबोल सुनावले आहे.
या व्हिडिओमध्ये मुकेश खन्ना म्हणाले की, ” तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने मी सुरक्षित आणि पुर्णपणे प्रकृती ठीक आहे. मला नाही माहिती अश्या प्रकारच्या चुकीच्या खोट्या अफवा कोण पसरवत आहे. तसेच या अफवा पसरवणार्या लोकांचा मानस काय आहे. ते अश्या प्रकारच्या खोट्या अफवांद्वारे लोकांचे मनोबल तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. या मानसिक विकृती असणार्या लोकांचा कसं आणि काय उपाय करावा? त्यांच्या चुकीची शिक्षा कोण देणार? आता हद्द पार झाली आहे.” मुकेश खन्ना यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे. याआधी देखील अनेक कलाकारांच्या निधनाच्या खोट्या अफवा सोशल मिडियावर पसरवल्या गेल्या असल्याने अनेकांकडून याबाबत रोष व्यक्त केला जातो.
महत्वाच्या बातम्या
- ‘सोलापूरच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी जलसंपदा विभागाने आवश्यक ‘नाहरकत प्रमाणपत्रे’ द्यावीत’
- ‘पुण्यात कोरोनाची लाट ओसरल्याचे चित्र असले, तरी आपण आता गाफील राहणार नाही’
- ‘शिवसेना पक्षप्रमुख आघाडीत गेल्यावर कसे बदलले, हे आता जनतेला माहीत झालं आहे’
- ‘राज्यपालांना केवळ एक निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत पुन्हा जबाबदारी टाळली’
- ऑक्सिजन एक्स्प्रेस पुण्यातील लोणीत दाखल; ३७ तासांत कापले १ हजार ७२५ किमी अंतर


