🕒 1 min read
नवी दिल्ली : देशभरात कोरोना स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. मोदी सरकार काँग्रेसशासित राज्यांवर उपाययोजना बाबतीत अन्याय करत असल्याचा आरोप काँग्रेसकडून नेहमी होतोय. उत्तरप्रदेश, गुजरातला झुकते माप देत असल्याची टीका मोदी सरकारवर होत आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधील बरेली येथील नवाबगंज मतदारसंघाचे भाजपाचे आमदार केसर सिंह गंगवार यांचा नुकताच कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांनी काही दिवसांपूर्वी नोएडा येथील यथार्थ रुग्णालयात उपचार कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर घेण्यास सुरुवात केली होती. मात्र रुग्णालयातच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूच्या दोन दिवस आधी त्यांनी लिहिलेलं एक पत्र व्हायरल झाले होते.
आता काँग्रेसने उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘मृतदेह नदीत फेकले जातायेत, मृतदेह नदीत फेकले जातात, कुत्रे मृतदेहांचे लचके तोडतात अन् योगीजी ऑल इज वेल म्हणतात’ असं म्हणत काँग्रेसने घणाघात केला आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट करत योगी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘उत्तर प्रदेशमध्ये कुत्रे मृतदेहांचे लचके तोडत आहेत. कचऱ्याच्या गाड्यांमधून मृतदेह वाहून नेले जात आहेत. मृतदेह नदीत फेकले जात आहे असं असतानाही योगीजी तुम्ही सर्वकाही ठीक असल्याचं सांगत आहात. संत आणि महंत स्वप्नातही खोटं बोलत नाहीत असं म्हणतात. मात्र तुम्ही सर्वकाही ठीक आहे, असा खोटा दावा करुन, असत्य बोलून योगीजी धर्माचा आणि राजधर्माचाही अपमान करताय’ असं रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.
संत और महंत सपने में भी झूठ नहीं बोलते
लेकिन योगी जी,
•उत्तर प्रदेश में शवों को कुत्ते नोच रहे,
•कूड़ा गाड़ी में ढोया जा रहा है पर शव ठेलों पर,
•शव नदियों में सड़ रहे हैं,
लेकिन आप ऑल इज वेल का राग अलाप रहे!ये झूठ,धर्म और राजधर्म दोनों का अपमान है।https://t.co/j42gCB5HoO
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) May 12, 2021
तसेच यावेळी रणदीप सुरजेवाला यांनी आपल्या ट्विटसोबत एका बातमीची लिंक पोस्ट केली आहे. या बातमीमध्ये उत्तर प्रदेशमधील तीन वेगवेगळ्या ठिकाणचे फोटो दाखवून राज्यातील कोरोना परिस्थिती किती गंभीर आहे याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान, उत्तरप्रदेश सरकारच्या कोरोना व्यवस्थापनावर भारतीय जनता पक्षाचे आमदारच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. राज्यातील परिस्थिती भीषण असून मदतीसाठी येणाऱ्यांना उपचारदेखील पुरवता येत नसल्याची पत्रं अनेक आमदारांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पाठवली आहेत. लखनऊ मध्यचे आमदार आणि मंत्री बृजेश पाठक यांनी सर्वप्रथम अशा प्रकारचं पत्र आदित्यनाथ यांना लिहिलं होतं. आता लखीमपूर खिरीचे आमदार लोकेंद्र प्रताप सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून असहायता व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढणार की सूट मिळणार ? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयाची शक्यता
- ‘काँग्रेसने देश निर्माण केलाय आणि मोदी आता स्वतःच घर उभं करतायत !’
- बंगालमध्ये नुकतेच विजयी झालेले भाजपाचे २ आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत
- ऑक्सिजन एक्स्प्रेस पुण्यातील लोणीत दाखल; ३७ तासांत कापले १ हजार ७२५ किमी अंतर
- सोनू सूदने पंतप्रधान व्हावे, यावर उत्तर देत त्याने पुन्हा एकदा जिंकली लोकांची मनं…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

