Share

मराठा आरक्षणासाठी २ दिवसीय विशेष अधिवेशन बोलवा : हरिभाऊ बागडे

Published On: 

मुंबई : सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकारण सुरु झाले आहे. अशावेळी मराठा आरक्षणाच्या संदर्भात केंद्र सरकारने पुढाकार घेऊन आरक्षण द्यावे अशी मागणी राज्य सरकारतर्फे करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला अधिकार नसून केंद्र सरकार याबाबत निर्णय घेऊ शकतं असं म्हटलं होतं. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष व मंत्री अशोक चव्हाण, मंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री जयंत पाटील आदी मंत्र्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची काल सायंकाळी भेट घेऊन पत्र दिले आहे.

या पार्श्वभूमीवर माजी विधानसभा अध्यक्ष आणि भाजप आमदार हरिभाऊ बागडे यांनी आज पत्रकार परिषद घेत विशेष अधिवेशनाची मागणी केली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विधिमंडळाचं दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. राज्य मागासवर्ग आयोग नेमणे, आयोगाचा अहवाल स्वीकारणे, तो केंद्रीय आयोगाकडे पाठवणे, ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी त्यांनी केली आहे. मराठा समाजाचं आरक्षण मजबूत करण्यासाठी दोन दिवसांचं अधिवेशन बोलवा, असे मत यावेळी बागडेंनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, आज भाजपचे खासदार नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीकडून जबाबदारी झटकण्याचं काम सुरु आहे. ठाकरे सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नव्हतं, अशा शब्दात राणे यांनी राज्य सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यपालांना निवदेन देण्याची घाई का? त्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते, सर्व मराठा संघटनांचे नेते, तज्ज्ञांना बोलवा. विचार विनिमय करा, चर्चा करुन पुढल्या पावलांबाबत निर्णय घ्यायला हवा होता, असंही राणेंनी सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!