औरंगाबाद सिल्लोड रोडवरील फुलंब्री परिसरातील सहारा व्हिल अलाइमेट जवळ दुधाच्या टँकरने दुचाकीस्वारांना दि. ११ मे मंगळवार रोजी दुपारी चिरडले. यात तरूणांचा जागीच मृत्यू झाला.
फुलंब्री पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सिल्लोड रोडवरील सहारा व्हील अलाइमेट समोर सिल्लोडहुन औरंगाबादकडे जाणारा दुध टँकर क्रमांक एम एच १७ बी वाय ८७८७ याने औरंगाबादहुन सिल्लोडकडे जाणारे दुचाकीस्वार शेख असलम शेख अहेमद वय २३ रा. असिफीया कॉलनी औरंगाबाद व सलीम रफिक पठाण वय ३३ रा . जयभीम नगर , औरंगाबाद घाटी परिसर यांना जोराची धडक दिली. यात दोघे जागीच ठार झाले असल्याचे सांगण्यात आले.
फुलंब्रीतील सहारा व्हिल अलायमेंट समोर भर दुपारी तीन वाजेच्या दरम्यान दुचाकी वरून सिल्लोड कडे जाणारे दुचाकी धारक दोन तरूणांना ट्रकने चिरडल्याने शहर सह तालुक्यात एकच खळबळ उडाली. दोन्ही तरूण रोडवर जोरदार अपटुन खाली कोसळले यात त्यांच्या अंगावरून ट्रक गेली. यामुळे ते गंभीर जखमी झाले. अपघात स्थळी नागरिकांची एकच गर्दी जमली होती. या प्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पुण्यात कोरोनाची लाट ओसरल्याचे चित्र असले, तरी आपण आता गाफील राहणार नाही’
- ‘शिवसेना पक्षप्रमुख आघाडीत गेल्यावर कसे बदलले, हे आता जनतेला माहीत झालं आहे’
- ‘राज्यपालांना केवळ एक निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत पुन्हा जबाबदारी टाळली’
- ऑक्सिजन एक्स्प्रेस पुण्यातील लोणीत दाखल; ३७ तासांत कापले १ हजार ७२५ किमी अंतर
- सोनू सूदने पंतप्रधान व्हावे, यावर उत्तर देत त्याने पुन्हा एकदा जिंकली लोकांची मनं…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

