Share

माणुसकी जिवंत आहे : आजीबाई पुरवतायत निराधार ज्येष्ठांना मोफत डबा !

Published On: 

🕒 1 min read

विरार : राज्यात मार्च महिन्यापासून कोरोनाबाधितांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे, रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. कोरोना स्थती आटोक्यात आणण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तर, आता जवळपास निम्मा महाराष्ट्र हा पूर्ण लॉकडाउनच्या गर्तेत गेला आहे.

नागरिकांना रुग्णालयांमधील बेड्सची कमतरता, औषधांचा तुटवडा यामुळे मनस्ताप सहन करावा लागला आहे. अशातच, रुग्णालयांतील बेड्ससाठी अव्वाच्या सव्वा दर आकारण्यापासून ते रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार यामध्ये माणुसकी हरवल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मात्र, अशातच अनेक व्यक्ती आपल्यापरीने करत असलेली मदत पाहता अनेक गरजुंना दिलासा मिळत आहे.

नालासोपारा येथील एका आजीने वयाच्या ६३ व्या वर्षी समाजसेवेचा ध्यास घेतला आहे. सध्याच्या स्थितीत निराधार ज्येष्ठांना दोन वेळच जेवण मिळणं कठीण झालं आहे. त्यामुळेच अशा निराधार ज्येष्ठांना उदरनिर्वाहासाठी गरजेचं असलेल जेवण पुरवण्याचं काम ६३ वर्षीय शारदा चौहान करत आहेत. एका सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून ही आजी शहरातील १५० हून अधिक ज्येष्ठ नागरिकांना दोन वेळचा जेवणाचा डबा मोफत देत आहे.

श्री आदी जिन युवक चेरिटेबल ट्रस्ट या सेवाभावी संस्थेने पुढाकार घेत मागील वर्षभरापासून अशा नागरिकांचा शोध घेत त्यांच्या जेवणाची जबादारी उचलली आहे. यात या ६३ वर्षीय शारदा चौहान यांनी मोलाचा वाटा पेलला आहे. या ट्रस्टचे नालासोपारा येथील सदस्य हिमांशू हिंगू आणि त्यांच्या पत्नीने आसपासच्या भागातील १५० निराधार वृद्धांची माहिती गोळा करून त्यांना जेवण पुरवण्याची सेवा सुरु केली आहे.

याबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना हिमांशू यांनी सांगितले की, ६३ वर्षीय आजी शारदा चौहान या एकट्या या सर्वांचे जेवण बनवतात. त्यांना मदतीला केवळ पोळ्या लाटण्यासाठी दोन महिला येतात. बाकी डाळ, भात, भाजी आणि एक गोड पदार्थ त्या दरोरज बनवत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या या कार्यात त्यांना मदत करणारे रमेश भाई (५३) हे सर्व डबे सायकलवर घेऊन संपूर्ण शहरभर फिरून या ज्येष्ठ नागरिकांच्या घरोघरी जावून देत आहेत, तर रिकामे डबे पुन्हा परत घेऊन येत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!