🕒 1 min read
नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात हिंसाचाराचा भडका उडाला आहे. अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्यात या पार्श्वभूमीवर भाजपच्या नवनिर्वाचित ७७ आमदारांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या सर्व आमदारांना निमलष्करी दलाच्या जवानांची सुरक्षा मिळणार आहे.
बंगालमध्ये निवडणुकीनंतर भाजपच्या नेत्यांना लक्ष्य केले जात असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत अनेक भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील हिंसाचार लक्षात घेता केंद्रीय गृहमंत्रालयाने भाजपच्या ७७ आमदारांना निमलष्करी दलाच्या जवानांचे सुरक्षा कवच देऊ केले आहे. यात सीआयएसएफ आणि ‘केंद्रीय राखीव पोलीस दल’ अर्थात सीआरपीएफचे जवान भाजपच्या आमदारांना पहारा देणार आहेत. या संबंधित प्रस्तावाला केंद्रीय गृह मंत्रालयाने मंजुरी प्रदान केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बंगालमधील राजकीय हिंसाचार आणखी रौद्रावतार धारण करत असल्यामुळेच भाजप आमदारांची सुरक्षा आणखी कठोर करण्यात आली आहे. तत्पूर्वी केंद्र सरकारने पाठवलेल्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या चमूने परिस्थितीची पाहणी केली. या संबंधित अहवालानंतर भाजप आमदारांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय दलांचे जवान तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करा-काँग्रेस
- राज्याच्या अधिकारातील सवलती मराठा समाजाला द्या, काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- आरोपमुक्त करण्याची विनंती करणे आरोपीचा अधिकार-सर्वोच्च न्यायालय
- ‘टीका करण्याऐवजी सल्ले द्या’, राजनाथ सिंहांचा काँग्रेसला टोला
- ‘कोरोनामुळे मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना गोपीनाथ मुंडे विमा योजनेचा लाभ द्या’, शिवसंग्रामची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


