🕒 1 min read
मुंबई : कोरोना परिस्थीतीमुळे भारतातील आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष हे जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्याकडे लागले आहे. भारत आणि न्युझीलंड दोन्ही संघ या सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र या सामन्याआधी न्युझीलंड संघाचा यष्टीरक्षक बीजे वॅटलिंग याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधुन निवृत्ती जाहीर केली आहे.
२००९ साली बीजे वॅटलिंगने पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. आपल्या निवृत्तीबद्दल बोलताना वॅटलिंग म्हणाला की, ‘कसोटी क्रिकेट हे क्रिकेट हे सर्वोत्तम प्रकारचे क्रिकेट आहे. न्युझीलंड संघाचे प्रतिनिधीत्व करणे खरच गौरवाची बाब होती माझ्यासाठी पाच दिवस सामना खेळताना या दरम्यान ड्रेसींग रुम मध्ये संघातील सहकाऱ्यासोबत वेळ घालवणे खुपच आनंदाचे होते. निवृत्तीनंतर मला या सर्व गोष्टींची आठवण येईल.’
Breaking: BJ Watling announces retirement from all forms of cricket, effective after NZ's tour of England.https://t.co/CSJLkrFjfj pic.twitter.com/3Xc5UuNKcB
— Cricbuzz (@cricbuzz) May 11, 2021
इंग्लंडच्या द रोज बाउल स्टेडियम, साउथम्टपन येथे १८ जून ते २२ जून या कालावधीत भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यानंतर न्यूझीलंडचा यष्टीरक्षक फलंदाज बीजे वॅटलिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलवीदा करणार आहे. याबाबत त्याने स्वत: घोषणा केली आहे. वॅटलिगने न्यूझीलंडकडून ७३ कसोटी सामने खेळताना ३८.११ च्या सरासरीने ३७७३ धावा केल्या आहेत. तर २८ एकदिवसीय सामन्यात ५ अर्धशतकांच्या सहाय्याने ५७३ धावा केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- बार-हॉटेल मालकांप्रमाणे शेतकरी, कष्टकऱ्यांचीही दखल घ्या; रक्षा खडसेंचे पवारांना पत्र
- सिल्लोड रोडवरील सहारा व्हील अलाईमेट परिसरात दुचाकीस्वारांना टँकरने चिरडले
- ‘घरी कडी लावून बसलेल्यांना रिकामटेकडा म्हणतात’, भाजपचा मुख्यमंत्री ठाकरेंना टोला
- कमानीच्या वादातून सत्तेतील दोन पक्ष पुन्हा आमने-सामने येणार! तीन वर्षांपासून काम अपूर्णच
- ‘मुख्यमंत्री महोदय मराठा समाजाला एप्रिल फूल करण्याचा कार्यक्रम करु नका’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

