🕒 1 min read
मुंबई : अरबी समुद्रात या आठवड्यात चक्रीवादळ धडकणार आहे. म्यानमारने चक्रीवादळाला टाँकटाइ असं नाव दिलं आहे. याच पार्श्वभूमीवर केरळ, गुजरात, महाराष्ट्राच्या किनारपट्टीला सर्तकतेचा इशारा देण्यात आलेला आहे. गुजरात किनारपट्टीला वादळाकडून नुकसान पोहचण्याची शक्यता याआधीच वर्तवण्यात आली होती.
दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचे तीव्र क्षेत्र निर्माण होत असल्याने चक्रीवादळ निर्माण होण्याचे संकेत हवामान तज्ज्ञांकडून देण्यात येत आहेत. नैर्ऋत्य मोसमी पावसासाठी हे चक्रीवादळ पोषक स्थिती निर्माण करू शकते. उद्यापासून अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण व्हायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांना हाय अलर्ट देण्यात आला आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसानं तडाखा दिला आहे. तर काही ठिकाणी जोरदार गारपिटही झाली आहे. आता राज्यात एक नवं संकट उभं ठाकलं आहे. येत्या चार दिवसांत अरबी समुद्रात चक्रीवादळ येणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली. त्यामुळे अरबी समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या मच्छिमारांना किनाऱ्यावर परत येण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. एकीकडे अवकाळी पावसाचा धोका असताना आता राज्यासमोर नवं संकट निर्माण झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
याच पार्श्वभूमीवर अरबी समुद्रात मच्छिमारांसोबत अन्य बोटींना लवकरत लवकर किनारपट्टीवर येण्याचा इशारा देण्यात आली आहे. त्याचबरोबर १५ मेच्या आसपास काही दिवस मच्छिमारांनी अरबी समुद्र, मालदिव, कोमोरीन, लक्षद्विप आणि केरळ किनारपट्टीच्या समुद्री भागात फिरकू नये, असंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- अभिनेता सलमान खानच्या दोन्ही बहिणींना कोरोनाची लागण
- अनिल देशमुखांना आणि पक्षाला बदनाम करण्यासाठी कारस्थान सुरु असल्याचा राष्ट्रवादीचा दावा
- कोरोनाच्या नियमांना पायदळी तुडवत मुस्लिम धर्मगुरुच्या अंत्ययात्रेसाठी जमली तुफान गर्दी
- वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मोठी मागणी
- पैसे दिलेच नाही तर ED कशाला? अनिल देशमुखांवरील कारवाईवरून काँग्रेसचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

