🕒 1 min read
मुंबई : कोरोना संसर्गामुळे जरी भारतातील आयपीएल स्पर्धा रद्द झाली आहे. मात्र ही स्पर्धा रद्द होत असातानाच या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहे. पण या दरम्यान क्रिकेटप्रेमीसाठी एक चांगली बातमी समोर आली होती. दक्षिण अफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हीलीयर्स हा टी-२० विश्वचषकासाठी पुनरागमन करु शकतो असे संकेत दक्षिण अफ्रिका क्रिकेट बोर्डाने दिले आहे.
ही बातमी ताजी असतानाच टी-२० जगतातील दिग्गज गोलंदाज लसीथ मलिंगानेही पुनरागमनाचे संकेत दिले आहे. महत्वाची बाब म्हणजे मलिंगा गेल्या काही महिन्यापासून क्रिकेटच्या मैदानावर सक्रिय नाहीये. आयपीएलच्या मागील दोन्ही सत्रातही त्याने सहभाग नोंदवला नव्हता. मात्र त्याने केवळ कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधुन निवृत्ती जाहीर केली आहे. मात्र टी-२० क्रिकेटमधुन अद्यापही मलिंगाने निवृत्ती जाहीर केलेली नाही. यामुळे श्रीलंका क्रिकेट संघ निवड समितीचे चेअरमन प्रमोद विक्रमसिंघे यांनी आम्ही लवकरच मलिंगाशी चर्चा करणार आहोत असे संकेत दिले आहे.
यावेळी बोलताना विक्रमसिंघे यांनी मलिंगा हा टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या रणनीतीचा एक भाग असल्याचे स्पष्ट केले आहे. मलिंगाने ही टी-२० क्रिकेटमध्ये श्रीलंका संघासाठी चांगली कामगीरी करण्याची इच्छा व्यक्त करुन दाखवली आहे. यामुळेच मी टी-२० प्रकारातुन निवृत्ती जाहिर केली नसल्याचे तो म्हणाला. मलिंगाने आतापर्यंत ८३ टी-२० सामन्यात १०७ गडी बाद केले आहे. या दरम्यान त्याने दोन वेळेस ५ गडी बाद केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘या’ तालुक्यात सर्वात कमी लसीकरण; मृत्युदरही जास्त!
- ‘या’ महान गोलंदाजाला आवडते हॉलिवूड अभिनेत्री ; मैत्री वाढवण्याच्या आहे प्रयत्नात
- जालन्यातील लोधी मोहल्ला भागात तुफान दगडफेक; दोन पोलीस कर्मचारी जखमी
- महाराष्ट्रात म्युकरमायकोसीसचे २ हजार बाधित रुग्ण तर ८ जणांचा मृत्यू : आरोग्यमंत्री
- ही कोरोनाची तिसरी लाट तर नाही ना ?, ठाकरे सरकारमधील मंत्र्याला संशय…


