Share

१८-४४ वर्षांवरील लसीकरणाचा वेग मंदावणार ; जेष्ठांना प्राधान्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोनावर मात करण्यासाठी देशातील अधिका-अधिक नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धास्तावलेल्या जनता लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत आहे. मात्र, एकीकडे कोरोनाचा वाढता धोका तर दुसरीकडे लसींचा तुटवडा यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

लसींचा तुटवडा असल्याने मोजक्याच ठिकाणी लसीकरण केले जात आहे. तर, नोंदणी केल्यानंतरच लसीकरण होत असले तरी साठा उपलब्ध झाला नसल्याचे कारण लसीकरण केंद्रावर दिले जात असल्याने अनेक नागरिकांना विना लसीकरणच माघारी यावं लागत आहे. लसीच्या या तुटवड्यामुळे राज्य शासन एक महत्वाचा निर्णय घेणार आहे. राज्यात 1 कोटी 84 लाख लसीकरण झाले आहे. आता 35 हजार कोव्हॅक्सिन उपलब्ध आहे. राज्य शासनाने खरेदी केलेली ३ लाख कोव्हॅक्सिन 45 वर्षांवरील व्यक्तींना दुसरा डोस देणे गरजेचं आहे. त्यामुळे हे डोस 45 पुढील वयोगटांना दिले जाणार आहे. असा निर्णय घेणार असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

वय 18 ते 44 या वयोगटातील लस देण्याचे जाहीर केले होते. पण लशीचा साठा कमी प्रमाणात उपलब्ध आहे. ज्यांना दुसरा लशीचा डोस दिला नाही तर पहिला डोस हा वाया जाऊ शकतो. म्हणून 18 ते 44 या वयोगटातील लशीचा साठा हा 45 वरील वयोगट यासाठी वळवण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवर चर्चा केली आहे. त्यामुळे 18 वर्षांवरील लसीकरणाचा वेग काही दिवस स्लो डाउन करावे लागेल, टास्क फोर्स समवेत चर्चा करून कॅबिनेट चर्चा करून निर्णय करू, असे टोपे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. रुग्ण संख्येत घट होत असून कोरोनामुक्तांचा आकडा वाढत आहे. राज्यात आज ३७ हजार २३६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून ५० ते ६० हजारांवर असलेल्या हा आकडा ४० हजारांच्या खाली आल्याने आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!