उस्मानाबाद: कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी आरोग्य विभागासह सर्व विभागांनी बारकाईने नियोजन करावे. त्याबरोबरच जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट सुरु करावेत, कोरोना बाधित रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून, त्यांना प्राथमिक औषधोपचार मिळण्याबरोबरच अत्यावश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात,अशा सूचना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी प्रशासनाला केल्या.
सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड संदर्भात जिल्हास्तरीय आढावा बैठक राज्यमंत्री बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर आदी उपस्थित होते. बनसोडे म्हणाले की, कोविडच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क करण्याबरोबरच ग्रामीण भागात देखील याबाबत अत्यावश्यक असलेला सर्व औषधोपचार उपलब्ध करून तो रुग्णांना वेळेवर मिळेल यासाठी योग्य नियोजन करावे.
रुग्णांना सेवा देण्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची जिल्हास्तरावर भरती करण्यात यावी. माझे कुटूंब, माझी जबाबदारी अंतर्गत जिल्ह्यातील कोविड हॉटस्पॉट असलेल्या १५६ गावांचे पुन्हा सर्वेक्षण करावे. त्यासाठी प्रत्येक घरातील व्यक्तींची कोविड संदर्भात आवश्यक असलेली ॲन्टिजेन तपासणी करावी. त्यासाठी कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. कोविड विषाणूंचा प्रसार व प्रादुर्भाव हे रोखण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेला सामूहिक जबाबदारी म्हणून सहकार्य करावे, असे आवाहन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले.
महत्वाच्या बातम्या
- पाय क्रिजमध्ये असुनही पाकिस्तानचा ‘हा’ खेळाडू झाला यष्टीचीत, अवघ्या तीन धावांनी हुकले शतक
- काँग्रेसच्या अध्यक्षपदी गांधी परिवारातील सदस्याला विरोध ?
- ‘युवराज आदित्य ठाकरे यांचे पर्यावरण प्रेम पूर्णतः बोगस व बेगडी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले’
- जगभरात गाजतोय निलेश लंकेचा डंका; परदेशातून मिळतेय कोविड सेंटरला मदत
- कोरोनाच्या नियमांना पायदळी तुडवत मुस्लिम धर्मगुरुच्या अंत्ययात्रेसाठी जमली तुफान गर्दी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

