🕒 1 min read
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानने कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये अनेक गरजवंतांना मदतीचा हात दिला. त्याने त्याच्या बिइंग ह्युमन या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून अनेक भुकेलेल्यांना मदतही केली. आता सलमान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोविडयोद्धा असणारे पोलीस आणि फ्रंटलाईन वर्कर्सची मदत करत आहे. अशातच आता सलमानच्या दोन्ही बहिणींना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती स्वतः सलमानने दिली आहे. बहिण अलवीरा अग्निहोत्री आणि अर्पिता शर्मा दोघीही कोरोनाच्या विळख्यात अडकल्या आहेत.
सलमान खानने कोरोनाच्या परिस्थितीबद्दल बोलताना सांगितले की, आधी लांबच्या लोकांना कोरोना झाल्याची बातमी कानावर येत होती. मागील वर्षी माझ्या ड्रायव्हरलासुद्धा कोरोना झाला होता. कोरोनाची दुसरी लाट खूपच भयानक आहे आणि कोरोना आता घरात घुसला आहे.
सलमान खानचा बहुप्रतीक्षित ‘राधे’ चित्रपट येत्या १३ मे रोजी रिलीज होणार आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे हा चित्रपट ओटीटी आणि थिएटर दोन्ही ठिकाणी रिलीज होणार आहे. दरम्यान ‘राधे’ चित्रपटातून होणारी सर्व कमाई कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी वापरली जाणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच झी एंटरटेनमेन्ट आणि सलमान खान फिल्म्सनं दिली होती.
महत्वाच्या बातम्या
- अनिल देशमुखांच्या अडचणी आणखी वाढल्या,आता ईडीनेही दाखल केला गुन्हा
- अनिल देशमुखांना आणि पक्षाला बदनाम करण्यासाठी कारस्थान सुरु असल्याचा राष्ट्रवादीचा दावा
- कोरोनाच्या नियमांना पायदळी तुडवत मुस्लिम धर्मगुरुच्या अंत्ययात्रेसाठी जमली तुफान गर्दी
- वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मोठी मागणी
- पैसे दिलेच नाही तर ED कशाला? अनिल देशमुखांवरील कारवाईवरून काँग्रेसचा सवाल


