Share

काँग्रेसच्या अध्यक्षपदी गांधी परिवारातील सदस्याला विरोध ?

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली :  देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाचा पुढील अध्यक्ष कोण? या बाबत अनिश्चितता कायम आहे. काँग्रेसच्या सर्वच कार्यकर्त्यांना या निर्णयाची प्रतिक्षा आहे. मात्र, या प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी आता आणखी काही वेळ प्रतिक्षा करावी लागणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी घेण्यात येणारी निवडणूक पुन्हा एकदा लांबवणीवर पडली आहे. काँग्रेसच्या कार्यबळ समितीने (सीडब्ल्यूसी) हा निर्णय घेतलाय. २३ जून रोजी ही निवडणूक होणार होती. मात्र, कोरोना महामारीचे कारण देत, काँग्रेसच्या वतीने निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, अध्यक्षपदी गांधी परिवारातील सदस्याला विरोध होत असल्यानेच ही निवडणूक वारंवार पुढे ढकलण्यात येत असल्याचा आरोप होतोय.

वास्तविक काँग्रेस अध्यक्ष पदाबाबत काँग्रेसमध्येच तीन गट पडले आहेत. पहिल्या गटाने काँग्रेसचे अध्यक्षपद राहुल गांधी यांच्याकडे पुन्हा एकदा सोपवण्यात यावे, असे मत व्यक्त केलय. तर दुसरा गट अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याकडेच राहण्यासाठी आग्रही आहे. तर या दोन्ही मतापेक्षा वेगळा विचार करणारा आणखी एक गट काँग्रेसमध्ये तयार झाला आहे. या गटाला ‘जी-२३’ असे नाव देण्यात आले आहे. काँग्रेस अध्यक्षांना पत्र पाठवणाऱ्या नेत्यांचा या गटामध्ये समावेश आहे.

२३ जून रोजी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याची शिफारस काँग्रेसच्या निवडणूक प्राधिकरणाने केली होती. मात्र, कोरोनाचे कारण देत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी निवडणूक पुढे ढकलण्याची शिफारस केली होती. त्याला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा यांनी अनुमोदन दिले. त्यामुळे सध्या सोनिया गांधीच पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, अध्यक्षपदाची निवडणूक जास्त काळासाठी पुढे ढकलण्यात येणार नाही. कोरोनाची रुग्ण संख्या कमी होताच निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यानुसार ही निवडणूक पुढील दोन ते तीन महिन्यात होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!