🕒 1 min read
मुंबई : दिग्दर्शक केदार शिंदे यांचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. त्यांच्या चित्रपटांमध्ये नेहमीच वेगळेपणा असतो. केदार शिंदे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. ते आपल मत नेहमी सोशल मीडियावर परखड मांडत असतात. त्यामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. यावेळी मात्र त्यांची वेगळ्याच कारणामुळे त्यांची चर्चा होत आहे. ते म्हणजे केदार शिंदे दुसऱ्यांदा विवाह बंधनात अडकले आहेत. लग्नाला २५ वर्षे झाल्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांनी पत्नीबरोबर पारंपरिक पद्धतीनं विवाह केला. त्यांच्या या विवाहाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
केदार शिंदे आणि त्यांच्या पत्नी बेला रविवारी ९ मे रोजी पुन्हा एकदा विवाह केला. त्यांच्या या विवाहाला केदार आणि बेला यांचे अगदी जवळचे मित्र अंकुश चौधरी, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, शर्मन जोशी आणि आदेश तसेच सुचित्रा बांदेकर यांची उपस्थिती होती. त्याशिवाय केदारचे अनेक मित्र आणि सिनेसृष्टीतील दिग्गजांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून केदार आणि बेला यांच्यावर अक्षता टाकल्या.
https://www.instagram.com/p/COpL7mGpAtI/?igshid=1vnayjgqtqnr2
सध्या कोरोनाचे संकट असल्यामुळे या विवाह सोहळ्याला बेला यांचे आई वडिल उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळं आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर या सेलिब्रिटी कपलने बेलाचं कन्यादान केलं. हळद, साखरपुडा किंवा इतर कोणतेही विधी २५ वर्षांपूर्वी झाले नाही. त्यामुळं ही सगळी हौस त्यांच्या मुलीने लग्नाच्या २५ व्या वाढदिवशी पूर्ण केली. तर मुलगी सनाने सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत लिहिले की, या दोघांच्या लग्नाला २५ वर्षे पूर्ण झाली. कोणताही मुहूर्त नाही की विधी नाही. तरीही त्यांनी वैवाहिक जीवनात यश मिळवलं. कोणताही मुहूर्त नाही की विधी नाही. तरीही त्यांनी वैवाहिक जीवनात यश मिळवलं. त्यामुळं लग्नासाठी सोहळा नव्हे तर लग्न महत्त्वाचं असतं हे आई बाबांनी पटवून दिल असल्याचेही ती सांगते.
केदार आणि बेला शिंदे यांनी पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. त्यामुळं पहिलं लग्न झालं त्यावेळी परंपरा, विधी या दोघांना अनुभवता आले नव्हते. त्यानुसार लग्नाच्या २५ व्या वाढदिवसाच्या दिवशी सर्वकाही ठरवण्यात आलं आणि रविवारी अगदी पारंपरिक पद्धतीनं विधिवत पुन्हा एकदा केदार आणि बेला यांची लग्नगाठ जुळली.
महत्त्वाच्या बातम्या
- श्रीलंका दौर्यावर राहुल द्रवीड करणार भारतीय संघाचे प्रशिक्षण
- टाळेबंदीच्या कालावधीत बालविवाहांचे प्रमाण वाढले,जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ‘हे’ निर्देश
- बाबर आझम बनला ‘हा’ कारनामा करणारा पाकिस्तानचा पहिलाच कर्णधार
- धोनीची ड्रीम विकेट घेण्यामागे पंतचा होता हात ; अवेश खानने केला खुलासा
- ‘सामना’ मधील लेखावर भूषणसिंह राजे होळकर नाराज, मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

