🕒 1 min read
हरारे : पाकिस्तान संघाने नुकत्याच पार पडलेल्या झिम्बाब्वे दौऱ्यात कसोटी मालिकेत २-० असा दणदणीत विजय मिळवला. दोन कसोटी सामन्याच्या या मालिकेत पाकिस्तान संघाने दोन्ही सामन्यात डावाने विजय मिळवत वर्चस्व गाजवले. यासह बाबर आझम हा पाकिस्तान संघाचा पहिला कर्णधार बनला आहे. ज्याने कर्णधार पदाच्या पदार्पनात सलग चार कसोटी सामने जिंकले आहेत.
झिम्बाब्वे मालिकेच्या आधी बाबर आझमने दक्षिण अफ्रिकेविरुद्ध कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. पाकिस्तानमध्ये झालेल्या या मालिकेत पाकिस्तान संघाने मालिकेतील दोन्ही सामन्यात दक्षिण अफ्रिका संघावर मात केली होती. बाबर आझमच्या कारकिर्दीतील पहिले दोन विजय ठरले. तर झिम्बाब्वे विरूद्ध पुढील दोन विजय मिळवत त्याने इतिहास रचला. झिम्बाब्वे विरुद्ध पहिला सामना हा १ डाव आणि ११६ धावांनी जिंकला तर दुसरा कसोटी सामना हा एक डाव आणि १४७ धावांनी जिंकला.
कर्णधार म्हणून पहिले सलग चार कसोटी सामने जिंकणारा बाबर आझम हा पाकिस्तानचा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. यासह आयसीसीच्या एप्रिल महिन्यातील पुरुष गटातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कारही बाबर आझमला जाहिर झाला. तसेच या दरम्यान आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रमवारीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला मागे टाकत अव्वल स्थान देखील गाठले होते.
महत्वाच्या बातम्या
- ‘सामना’ मधील लेखावर भूषणसिंह राजे होळकर नाराज, मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
- इंग्लंडमधील भारतीय संघाचा १४ वर्षाचा वनवास संपेल का..?
- एप्रिल महिन्याच्या आयसीसी पुरस्कारात पाकिस्तानच्या बाबर आझमने मारली बाजी
- बीडचा ‘कृषी विमा पॅटर्न’ आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी ठरणार संजीवनी
- ख्रिस भाऊ घेतोय जगातील सर्वात मोठ्या बर्गरचा आस्वाद ; पहा व्हिडीओ


