🕒 1 min read
मुंबई : राज्यात मार्च महिन्यापासून कोरोनाबाधितांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे, रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. कोरोना स्थती आटोक्यात आणण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तर, आता जवळपास निम्मा महाराष्ट्र हा पूर्ण लॉकडाउनच्या गर्तेत गेला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये या लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. रुग्ण संख्येत घट होत असून कोरोनामुक्तांचा आकडा वाढत आहे. राज्यात आज ३७ हजार २३६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून ५० ते ६० हजारांवर असलेल्या हा आकडा ४० हजारांच्या खाली आल्याने आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.
६१ हजार ६०७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. दरम्यान, ५४९ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर, घटणाऱ्या कोरोना बाधितांमुळे अंशतः दिलासा मिळत असला तरी राज्यावरील संकट हे कायम आहे. राज्यात सध्या ५ लाख ९० हजार ८१८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
‘या’ १७ शहरांमध्ये पूर्ण लॉकडाऊन !
नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, वर्धा, सांगली, सातारा, बीड, नांदेड, वाशिम, अमरावती, यवतमाळ, अकोला, सिंधुदुर्ग, इंदापूर, बारामती, बुलढाणा या १८ शहरांमध्ये पूर्ण लॉकडाऊन करण्यात आला आहे. दरम्यान, यातील काही शहरांमध्ये येत्या २ दिवसात पूर्ण लॉकडाऊन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात जरी पूर्ण लॉकडाऊन नसला तरी या शहरांचा व जिल्ह्यांचा आढावा घेतल्यास अर्धा महाराष्ट्र पूर्ण लॉकडाउनच्या स्थितीमध्ये गेला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पुणे सावरतंय : नव्या कोरोना बाधितांमध्ये मोठी घट !
- …तर ही वेळच आली नसती, विदेशातून मिळणाऱ्या मदतीवर राहुल यांची टीका
- आता एकाच अर्जाद्वारे मिळणार शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ
- कोविड सेंटरमध्ये भक्तिमय वातावरण ;रामायण-महाभारताचा शो, गायत्री मंत्राचा जप
- नुसत्या जाहिरातीच्या माध्यमातून कोरोना संपणार नाही, नवाब मलिकांचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

