भोपाल : देशात कोरोनाचे संकट गंभीर बनले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शनिवारी देशात जवळपास साडेतीन लाख कोरोना रुग्ण आढळून आलते. गेल्या सलग चार दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या ३ लाखांच्या पुढे आढळून येत आहे. देशात आरोग्यसेवा कमी पडू लागल्या आहे, ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू होत आहे.
अशा भीषण परीस्थितीमध्ये सरकारकडून क्वारंटाईन सेंटर व कोविड सेंटरची उभारणी केली जात आहे. भोपाळच्या मोतीलाल नेहरु स्टेडियममध्ये १ हजार बेड्सच्या क्वारंटाईन सेंटरची सुरुवात करण्यात आली. हे सेंटर सौम्य ते मध्यम प्रकारची लक्षणं असलेल्या कोरोना रुग्णांसाठी असून भारतीय जनता पक्ष आणि माधव सेवा केंद्राच्या माध्यमातून याची उभारणी करण्यात आली आहे. क्वारंटाईन सेंटरमध्ये अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत.
रुग्णांचे मन गुंतवून ठेवण्यासाठी एका मोठ्या स्क्रीनवर रामायन आणि महाभारताचे एपिसोड दाखवले जात आहेत. एक मोठी स्क्रीन सेंटरमध्ये लावण्यात आली असून त्यावर रामायन, महाभारत मालिका पाहता येणार आहेत. तसेच दिवसभर महामृत्यूंजय मंत्र आणि गायत्री मंत्राचा जप सुरु राहणार आहे. शिवाय दररोज योगा सेशनही ठेवले जात आहेत. एकंदरीतच या सर्व सोयीमुळे सध्या तेथील वातावरण हे भक्तिमय झाले आहे असे म्हंटले तर अतिशोयोक्ती ठरणार नाही.
दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जवळपास अर्धा महाराष्ट्र पूर्ण लॉकडाऊनच्या गर्तेत गेला आहे. १७ शहरांसह जिल्ह्यांमध्ये देखील पूर्ण लॉकडाऊन लावण्यात येत आहे. एकाबाजूला मुंबईसह महाराष्ट्राचं कौतुक केंद्रीय स्तरावर केलं जात असलं तरी ग्रामीण महाराष्ट्रासह काही शहरांमध्ये कोरोनाचा उद्रेक होत आहे. याच पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन कठोर पाऊल उचलत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पुणे सावरतंय : नव्या कोरोना बाधितांमध्ये मोठी घट !
- …तर ही वेळच आली नसती, विदेशातून मिळणाऱ्या मदतीवर राहुल यांची टीका
- आता एकाच अर्जाद्वारे मिळणार शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ
- मायदेशी परतल्यानंतर बोल्टची भावुक पोस्ट, भारतात पुन्हा परतण्याची केली इच्छा व्यक्त
- नुसत्या जाहिरातीच्या माध्यमातून कोरोना संपणार नाही, नवाब मलिकांचा हल्लाबोल


