जालना: जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आता जालना जिल्हा कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे, असे चित्र तयार झाले आहे. शनिवारी कोरोनामुळे ९ जणांचा मृत्यू झाला असून ५८४ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. कोरोनाची परिस्थिती चिंताजनक होत असून नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
जिल्ह्यात शनिवारी उपचारादरम्यान ९ जणांचा मृत्यू झाला तर ५८४ नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे मृतांची एकूण संख्या ८४९ तर बाधितांचा आकडा ५२ हजार १६९ वर जाऊन पोहोचला आहे. शिवाय, २ हजार ७२८ अहवाल अद्याप प्रयोगशाळेत प्रलंबित आहेत. यामुळे कोरोनाच्या या उद्रेकाला थोपवण्याचे आव्हान नागरिकांसमोर कायम आहे.
शनिवारी करण्यात आलेल्या चाचणीत आरटीपीसीआरद्वारे ५२८, तर अँटिजनमधून ५६ असे ५८४ अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी दिली. दरम्यान, एकूण ४४ हजार ६७५ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी गेले असून ८४९ बाधितांचा मृत्यू झाला. तर सध्या ६ हजार ६४५ अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यासोबतच ७८८ रुग्णांना शनिवारी संस्थात्मक अलगीकरणात दाखल केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मुंबई आणि महाराष्ट्राची आजची अवस्था पाहता ते कौतुक करतील, याची सुतराम शक्यता नाही’
- बीडमध्ये नोंदणी करूनही मिळेना लस
- अवघ्या ‘दिडशे रुपया’त पार पडलं ‘या’ अभिनेत्याचं लग्न
- बीड जिल्ह्यातील पाच दिवस कडक लॉकडाऊनचा निर्णय रद्द
- बुमराहचे फॅन एम्ब्रोस म्हणाले, ‘कसोटीत 400 बळी मिळवण्याची आहे ताकत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
