Share

मोदी सरकार हे नेम चेंजर नसून एम चेंजर- नरेंद्र मोदी

Published On: 

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठराव आज (बुधवार) लोकसभेत मांडला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला सन्मान देण्यासाठी भाजपने आपल्या सर्व खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या होत्या.

नरेंद्र मादी यांनी भाषणातून चांगलाच समाचार घेतला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी मोदी सरकार हे गेम चेंजर नव्हे तर नेम चेंजर असल्याची टीका केली होती. कॉंग्रेस सरकारच्या योजनांचे नाव बदुलून मोदी सरकार वापरत आहे. असे म्हटले होते. आज लोकसभेत नरेंद्र मोदींनी त्यांच्या टीकेला उत्तर देत ‘आपले सरकार हे नेम चेंजर नसून एम चेंजर’ असल्याचे म्हटले आहे.

नरेंद्र मोदी म्हणाले,काँग्रेसने सरदार पटेल यांच्यावर अन्याय केला. सरदार पटेल पंतप्रधान असते तर काश्मीर प्रश्नच निर्माण झाला नसता आणि संपूर्ण काश्मीर आज भारताचाच भाग असता, देशातील लोकशाही ही काँग्रेस आणि जवाहरलाल नेहरुंची देणगी असल्याचे काँग्रेसचे नेते म्हणतात  पण हाच तुमचा इतिहासाचा अभ्यास आहे का? असे म्हणत त्यांनी काँग्रेसला चांगलेच फटकारले. तसेच लोकशाही हा देशाच्या संस्कृतीचा एक भागच असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रपतींचे अभिभाषण हे कोणत्या एका पक्षाचे नसते. ते सर्वांचे असते. काँग्रेसला वास्तवाची जाणीव असती तर त्यांची ही अवस्था झाली नसती.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!