Share

सुखद, सकारात्मक! औरंगाबादेत लवकरच शंभर बेड्सचे कोविड बाल रुग्णालय

Published On: 

औरंगाबाद : कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेत लहान बालकांना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशी परिस्थिती निर्माण झाल्यास त्याला तोंड देण्यासाठी शुक्रवारी (दि. ८) महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी महापालिका व शहरातील बाल रोग तज्ञ डॉक्टरांची बैठक घेतली. यावेळी आयुक्तांनी बालका संदर्भातील कोरोना संसर्गाचे वेळीच नियोजन करून सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या. मनपाच्या वतीने एमजीएम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे १०० खाटांचे बालकांसाठी कोव्हिड रुग्णालय सुरू करण्याचा महत्वपूर्ण व दिलासादायक निर्णय यावेळी घेण्यात आला.

मनपाच्या सिडको एन आठ रुग्णालयात कोविड गरोदर मातांना औषधोपचाराच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा सूचना प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी दिल्या. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून या लाटेत लहान बालकांना संसर्ग होण्याचा धोका तज्ञांनी व्यक्त केला आहे.

या लाटेत बालकांना संसर्गाचा धोका निर्माण झाल्यास त्याला कसे रोखता येईल, त्यासाठी कशा पद्धतीने नियोजन करावे लागेल यासंदर्भात बाल रोग तज्ञाची प्राथमिक बैठक बोलवण्यात आली होती. बैठकीत खाजगी डॉक्टरांनी सांगितले की आठ ते दहा टक्के बालकांमध्ये सर्दी ,खोकला अशी सौम्य लक्षणे आहेत. पण त्याबद्दल घाबरण्याचे कारण नाही. हार्ट डिसीज तसेच इतर आजार कॉमोर्बिटी अशा बालकांना कोरोना झाल्यास ते गंभीर होऊ शकतात.

या बैठकीत पूर्वतयारी म्हणून शहरात किती बाल रुग्णालय आहेत. किती बाल रोग तज्ञ आहेत, कोणत्या बालरुग्णालया मध्ये बालकांसाठी केअर सेंटर सुरू करण्यात येतील, किती डॉक्टर तसेच औषध व साहित्य लागणार आहे. या काळात काम करणाऱ्या मनपाच्या डॉक्टरांना घाटी व खाजगी रुग्णालयात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याचे नियोजन करण्याच्या सूचना मनपा प्रशासक पाण्डेय यांनी दिल्या. या बैठकीला महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर तसेच शहरातील तज्ञ बाल डॉक्टर्सची विशेष उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!