🕒 1 min read
मुंबई : आज बहुमरच्या पत्नीचा वाढदिवस आहे. यादिवशी बुमराहने खास अंदाजात पत्नीला शुभेच्छा दिल्या आहेत. लग्नानंतर संजना गणेशनचा पहिला वाढदिवस आहे. तिचा जन्मदिवस खास बनवण्यासाठी बुमराहने खास अंदाजात तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
बुमराहने एक फोटो शेअर करत रोमॅंटिक अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. पोस्ट शेअर करत बुमराहने लिहिले,’दररोज माझे हृदय चोरणाऱ्या व्यक्तीस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तू माझी आहेस, खूप प्रेम,’
नुकताच जसप्रित बुमराह लग्नबंधनात अडकला आहे. टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहचं स्पोर्ट्स एँकर संजना गणेशन सोबत लग्न झालं. १५ मार्चला गोव्यामध्ये हे दोघंही विवाहबंधनात अडकले.
Happy birthday to the person who steals my heart everyday. You’re my person, I love you. ❤ pic.twitter.com/4QuIPUL1kX
— Jasprit Bumrah (@Jaspritbumrah93) May 6, 2021
लग्नानंतर लगेच बुमराह आयपीएलसाठी मैदानावर उतरला. पत्नी संजना देखील कामावर रुजू झाली होती. भारत-इंग्लंड यांच्यातल्या दुसऱ्या वन डे सामन्यात ती स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर एक्स्ट्रा इनिंग या खास कार्यक्रमात सूत्रसंचालन करताना दिसली. आता वाढत्या कोरोनाचा धोका लक्षात घेता आयपीएल स्थगित केली आहे. त्यामुळे आता दोघेजण सोबत वेळ घालवतना दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा विषय अहंकाराचा विषय करू नये’
- ‘बंगाल जळत असताना स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणारे महाराष्ट्रातील नेते गप्प का?’
- ‘मराठा समाजाने कोणाच्या दबावाला अथवा दिशाभूल करणाऱ्यांच्या वक्तव्यांना बळी पडू नये’
- ‘मराठा समाजाने ज्या संयम आणि धीराने आजवर हा लढा दिला आहे, तोच संयम या पुढेही दाखवावा’
- ‘सर्वोच्च न्यायालयातील अपयशाची जबाबदारी अशोक चव्हाण व राज्य सरकारला घ्यावीच लागेल’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
