🕒 1 min read
मुंबई : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास पूर्णपणे स्पष्ट झाले आहेत. सत्तेचा दावा करणाऱ्या भाजपला पराभूत करत ममता बॅनर्जींनी तिसऱ्यांदा पश्चिम बंगालची सत्ता मिळवल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळं ममता दीदींवर पुन्हा अभिनंदनाचा वर्षाव होतोय तर भाजपवर टीका होत आहे. महाविकास आघाडीतील अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागले आहे.
‘भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालमध्ये गेल्या तीन वर्षांपासून आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अबकी बार २०० आकडे पार असे बोलून फेकाफेकीचे राजकारण केलं. आता निवडणुकीच्या निकालाचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे’, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.
‘देशात कोरोनामुळे जी परिस्थिती निर्माण झालीय त्याची जबाबदारी घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली होती. मात्र, त्यावर अमित शाह यांनी जेव्हा जनता आम्हाला नाकारेल तेव्हात आम्ही राजीनामा देऊ, असं म्हटलं होतं. तेव्हा आता बंगालच्या जनतेने त्यांचा राजीनामा मागितला आहे. त्यामुळे अमित शाह आणि मोदी यांनी राजीनामा द्यावा’, अशी मागणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
नवाब मालिकांच्या या मागणीवर आता भाजपचे नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी खिल्ली उडवली आहे. ‘अहो, नवाब मलिक अजित दादांचा राजीनामा मागायचाय तर सरळसरळ मागा. हे द्राविडी प्राणायम कशाला?’ असे ट्वीट करून त्यांनी मलिकांना टोला लगावला आहे.
प.बंगालमधील मतदारांनी नाकारल्यामुळे गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा- नवाब मलिक
अहो, नवाब मलिक अजित दादांचा राजीनामा मागायचाय तर सरळसरळ मागा. हे द्राविडी प्राणायम कशाला?????
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 2, 2021
दरम्यान, आज पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पद्दुचेरी या विधानसभा निवडणूकांचा निकाल जाहीर होणार आहे. पाच राज्यात जरी निवडणूक असले तरी संपूर्ण देशाचे लक्ष पश्चिम बंगालच्या निकालांकडे लागणार आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर आहे. खेला होबे म्हणून ममता बॅनर्जी यांनी भाजपला आव्हान दिले होते.
महत्वाच्या बातम्या
- फारच लवकर उन्मत्त झालात, पाटील जास्त हवेत जाऊ नका; मिटकरींचा चंद्रकांतदादांना टोला
- वॉर्नरला कर्णधारपदावरून हटवण्याचे सायमन डौल यांनी सांगितले कारण…
- समाधान आवताडे यांचा विजय हा महाविकास आघाडीला थोबाडीत मारल्यासारखा – चंद्रकांत पाटील
- #पंढरपूर : राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या समाधान आवताडेंचा दणदणीत विजय !
- या विजयाचे संपूर्ण श्रेय बंगालच्या वाघिणीलाच द्यावे लागेल, उद्धव ठाकरेंकडून कौतुक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

