Share

फारच लवकर उन्मत्त झालात, पाटील जास्त हवेत जाऊ नका; मिटकरींचा चंद्रकांतदादांना टोला

Published On: 

🕒 1 min read

पंढरपूर : अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आता स्पष्ट झाला आहे. भाजपच्या समाधान आवताडे यांनी मोठी आघाडी घेतली असून राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांचा पराभव झाला आहे. ३७१६ मतांच्या आघाडीने समाधान आवताडे यांचा विजय झाला आहे.

भारतनानांच्या निधनामुळे त्यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांच्यामागे सहानुभूती असल्याने त्याचा त्यांना मोठा फायदा होईल अशी शक्यता वर्तवली जात असली तरी समाधान आवताडे यांना पंढरपुरात परिचारक गटाचं मोठं समर्थन मिळाल्यामुळे भालके यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री जयंत पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासारख्या दिग्गजांनी उमेदवारांच्या प्रचारासाठी जोर लावला होता.

मात्र, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला भाजपने पराभूत केल्यामुळे भाजप नेत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत patil यांनी याच आनंदाच्या भारत उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली आहे. समाधान आवताडे यांचा विजय हा महाविकास आघाडीला थोबाडीत मारल्यासारखा आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

चंद्रकांत पाटील यांच्या या टीकेला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘फारच लवकर उन्मत्त झालात. तिकडे पश्चिम बंगाल मध्ये तुमच्या विश्वगुरू पासून, संन्याशापर्यंत अख्खे तंबू ठोकून होता. तुमचा दारुण पराभव म्हणजे एका ममता नावाच्या वाघीनीने अख्याचे थोबाड रंगवले त्याचं काय? जास्त हवेत जाऊ नका पाटील गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांचे थोबाड रंगवले गेले आज.’ असं म्हणत मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांना फैलावर घेतले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!