Share

तुम्ही जामिनावर सुटलेले आहात त्यामुळे जास्त जोरात बोलू नका, चंद्रकांतदादांचा भुजबळांना टोला

Published On: 

पुणे : आज पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पद्दुचेरी या विधानसभा निवडणूकांचा निकाल जाहीर होणार आहे. पाच राज्यात जरी निवडणूक असले तरी संपूर्ण देशाचे लक्ष पश्चिम बंगालच्या निकालांकडे लागणार आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर आहे. खेला होबे म्हणून ममता बॅनर्जी यांनी भाजपला आव्हान दिले होते.

संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगालच्या नंदिग्राममधून ममता बॅनर्जींनी विजय मिळवला आहे. भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचा त्यांनी पराभव केला. टीएमसी 208, भाजप 81 जागा, काँग्रेस 1 आणि इतर 2 जागांवर आघाडीवर आहेत.

यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ममता बॅनर्जी झाशीच्या राणी प्रमाणे लढल्या.. मै अपना बंगाल नही दुंगी अशी प्रतिज्ञा ममता यांनी केली होती. पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्या एक दिवसआड सभा होत होत्या. ८ ते १० मंत्री ठाण मांडून बसले होते. पण, उपयोग झाला नसल्याची टीका भुजबळ यांनी केलीय.

संपूर्ण शक्ती लावूनही आसाम वगळता भाजपला कुठेच साथ नाही. भाजप विरोधात प्रचंड लाट देशात तयार झाली आहे. या काळात देशात निवडणूक झाली तर भाजप नावालाही सापडणार नाही, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिलीय. तर पंढरपूर पोट निवडणुकीचा निकाल गट तट आणि इतर स्थानिक राजकारणामुळे लागत आहे, त्यावरून देशाचा कल बांधता येत नाही, असेही ते म्हणाले.

भुजबळांच्या या टीकेचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खरपूस समाचार घेतला आहे. ‘छगन भुजबळ यांनी पंढरपूरच्या निकालावर प्रतिक्रिया द्यावी. तुम्ही जामिनावर सुटलेले आहात. तुम्ही काही निर्दोष सुटलेले नाहीत. त्यामुळे जास्त जोरात बोलू नका अन्यथा फार महागात पडेल. बोलायचं असेल तर पंढरपूर, पद्दुचेरी आणि आसामवर बोला’, असं चंद्रकात पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!