Share

पुण्यासाठी पीएम केअर्स फंडातून मिळाले ३० व्हेंटीलेटर्स; महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

Published On: 

🕒 1 min read

पुणे : राज्यात गेल्या महिन्यापासून कोरोनाबाधितांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मुंबईत देखील एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दररोज दहा हजारांहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात येत होती. यामुळे, रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्यात सध्या १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसत असून रुग्णसंख्या काहीशी घटत आहे. दरम्यान, पुण्यातील गंभीर रुग्णांची संख्या लक्षात घेता व्हेंटीलेटर्सची संख्या ही कमी होती. त्यामुळे आता केंद्र सरकारच्या पीएम केअर्स फंडातून पुण्यासाठी ३० व्हेंटीलेटर्स देण्यात आले आहेत. हे व्हेंटीलेटर्स पुणेकरांच्या सेवेत दाखल झाल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून पीएम केअर्सच्या माध्यमातून पुण्याला ३० व्हेंटीलेटर्स प्राप्त झाले आहेत. या मदतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचे आभार,’ असं ट्विट मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे. यासोबतच, शहरात लसीकरण देखील मोठ्या प्रमाणात सुरु आहे. अशातच, राज्य सरकारने कडक लॉकडाऊन लागू केल्यामुळे शहरातील बाधितांची संख्या कमी होण्यास अधिक वेग येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशीच रुग्णसंख्या घटत राहिल्यास आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे ‘आता नको कोणतीही ढिलाई, बाकी आहे मोठी लढाई !’ असं आवाहन पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!