🕒 1 min read
औरंगाबाद : अठरा वर्षावरील युवकांच्या लसीकरणासाठी प्रशासनाची तयारी झाली असून राज्य शासनाच्या गाईडलाईन्स आल्याची माहिती औरंगाबाद मनपाने दिली. औरंगाबाद महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून व शासनाने निर्देश केल्याप्रमाणे उद्या शनिवारी (दि.१) औरंगाबाद शहरात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरु होणार आहे. मुकुंदवाडी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत दुपारी दोन वाजता लसीकरणाचे उद्घाटन होईल. अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.
ही लस औरंगाबाद शहरातील सादात नगर आरोग्य केंद्र, कैसर कॉलनी आरोग्य केंद्र, मुकुंदवाडी आरोग्य केंद्र या तीन आरोग्य केंद्रांवर देण्यात येईल. यासाठी लाभार्थ्यांनी कोविन ॲप वर रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. अशा प्रत्येकी १०० लाभार्थ्यांना प्रत्येक केंद्रांवर लसीकरण करण्यात येणार आहे. कोविन ॲप वर आपण अपॉइंटमेंट ऑप्शन सिलेक्ट करावे.
त्या ठिकाणी तिन्ही आरोग्य केंद्राची नावे दिसतील लाभार्थ्यांनी आपल्या जवळील एका केंद्राला सिलेक्ट करायचे आहे. या केंद्रावर उद्या १ मे रोजी लसीकरणाची वेळ दुपारी दोन ते सहा राहील. या केंद्रांवर फक्त १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांना लस मिळणार आहे. त्यासाठी आवश्यक लस मनपा आरोग्य विभागात उद्या सकाळी प्राप्त होणार आहे.
रविवारी ‘यांचे’ लसीकरण होणार नाही
इतर ज्या केंद्रांवर ४५ च्या पुढील लाभार्थ्यांना लसीकरण चालू होते ते सध्या लस प्राप्त नसल्यामुळे बंद राहणार आहे. लस प्राप्त झाल्यानंतर त्या त्या केंद्रावर लसीकरण पूर्ववत चालू होईल. उद्या इतर नागरिकांनी गर्दी करू नये. असे आवाहन महापालिकेने केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘उद्धवजी, आपण फक्त मुंबईचे नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात याची ग्वाही मिळेल अशी अपेक्षा करतो’
- सकारात्मक! लातूर मधल्या या आजी-आजोबांनी केली कोरोनावर मात
- १८ वर्षावरील तरुणांचे लसीकरण, जिल्हयासाठी हव्यात २० लाख लसी!
- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचा २३ वा दिक्षांत समारंभ ४ मे रोजी
- ‘…त्यामुळे मला काही होणार नाही या भ्रमात राहू नका, विनाकारण बाहेर पडू नका’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
