Share

दिलासादायक! लातूरमध्ये १ हजार १३४ नव्या रुग्णांची भर तर १ हजार ४०६ जणांची कोरोनावर मात

Published On: 

लातूर: जिल्ह्यात कोरोना रुग्णांची भर होत असली तरी त्यातून बरे होणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय आहे. गेल्या काही आठवड्यांपासून जिल्ह्यात लसींचा तुटवडा जाणवत असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. त्याच सोबत जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे तसेच स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

जिल्ह्यात गुरुवारी नव्या १ हजार १३४ करोना बाधित रुग्णांची भर पडली असून गेल्या २४ तासांमध्ये ३१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, १ हजार ४०६ रुग्णांनी कोरोनावर मात करुन ते सुखरुप घरी गेले आहेत. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी दिवसेंदिवस कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. कोरोनावर मात करुन घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. गेल्या २४ तासांमध्ये ९५१ आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या त्यात ३०८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले.

तसेच, ३ हजार २६७ रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आल्या यात ७०३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. तर, काल प्रलंबित असलेल्या ४६९ अहवालांमधील १२३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. असे एकूण १ हजार १३४ रुग्ण गुरुवारी पॉझिटिव्ह आढळून आले. तर, उपचारादरम्यान गंभीर झालेल्या ३१ रुग्णांचा मागील २४ तासांत मृत्यू झाला. यामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यातील मृतांचा आकडा १ हजार २४६ च्या घरात पोहोचला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!