🕒 1 min read
उस्मानाबाद: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने रुग्णालयात उपचार घेणारा आपला रुग्ण ठणठणीत होऊन परत येईल की नाही, अशी भीती प्रत्येकाला वाटत आहे. यात आजारामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या जास्त असताना आपला माणूस गेल्याच्या धसक्याने अनेकजण जीव सोडत आहेत. हृदय पिळवटून टाकणाऱ्या अशाच दोन घटना उस्मानाबाद शहरासह तालुक्यात घडल्या.उस्मानाबादेत कोरोनामुळे पत्नीचा मृत्यू झाल्याने अर्धातासातच पतीने प्राण सोडले तर तालुक्यातील हिंगळजवाडी येथे मुलाच्या मृत्यूचा धक्का बसल्याने आईनेही जगाचा निरोप घेतला.
कोरेानाची दुसरी लाट अतिभयंकर आहे. संसर्ग झाल्यानंतर चालता बोलता माणसे निघून जात आहेत. अशा परिस्थितीत मनोधैर्य खचून धसक्यानेही जीव जात आहेत. कोरेाना झाल्याचे समजताच अनेकांना हृदयविकाराचे झटके आले आहेत. वास्तविक पाहता कोरेानातून नीट होण्याचेच प्रमाण अधिक आहे, हे लक्षात घेऊन एकमेकांना धीर देण्याची गरज आहे. कोराेनातून वाचण्यासाठी काळजी जरूर घ्या, मात्र घाबरून जाऊ नका, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
अल्पशा आजाराने जखडलेल्या पती-पत्नीने एकाच दिवशी पाच मिनिटांच्या फरकाने प्राण सोडले. हा प्रकार शहरातील एका खासगी रुग्णालयात बुधवारी सायंकाळी घडला.त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. कोरेानाने अनेकांची नाती विखुरली आहेत. क्षणात होत्याचे नव्हते होत आहे.चालता-बोलता माणसांना काळ हिरावून नेत आहे. त्यामुळे अनपेक्षित, अकल्पित घडणाऱ्या या प्रकारांनी नागरिकांची मन:स्थिती अस्थिर होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पेठ बीड येथे जुगार अड्ड्यावर छापा; तिघे अटकेत, सात जण फरार
- ‘अडचणीच्या काळात भारताला मदत करताना अमेरिकेला समाधान वाटतंय’
- कोरोनासाठी आ. सतिश चव्हाण घाटीला देणार ‘इतका’ निधी!
- बीडमध्ये १४७० नवे बाधित; गुरुवारच्या आकड्यांनी चिंतेत भर
- उस्मानाबादेत चाैदा दुकानांना सील, व्यापाऱ्यांमध्ये खळबळ

